मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Independence Day: यंदाच्या स्वातंत्र्यदिनी मुलांचा करा हटके लूक, साकारा ‘या’ स्वातंत्र्यसेनानींची वेशभूषा

Independence Day: यंदाच्या स्वातंत्र्यदिनी मुलांचा करा हटके लूक, साकारा ‘या’ स्वातंत्र्यसेनानींची वेशभूषा

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी करा हटके लूक, साकारा ‘या’ स्वातंत्र्यसेनानींची वेशभूषा

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी करा हटके लूक, साकारा ‘या’ स्वातंत्र्यसेनानींची वेशभूषा

Freedom fighter look of Children on independence day: सारा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करत आहे.स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांना कोणत्या स्वातंत्र्यसेनानींची वेशभूषा करता येऊ शकते, हे आज पाहणार आहोत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 ऑगस्ट :  यंदा भारताच्या स्वातंत्र्याला (Independence Day) 75 वर्षं पूर्ण होत आहेत. सारा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करत आहे. अनेक संस्था, शाळा, ऑफिसेस अशा ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गाणी, डान्स, वेशभूषा (Fancy Dress) स्पर्धा आदींच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला उजाळा देण्याचा प्रयत्न होतो आहे. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आठवण करण्यासाठी वेशभूषा हा चांगला पर्याय असतो. त्यांचं योगदान पुढच्या पिढीला समजावून सांगण्यासाठी वेशभूषेचा आधार घेतला तर मुलांनाही त्यातून आनंद मिळू शकतो. मोठी माणसंही अशा वेशभूषा करू शकतात. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांना कोणत्या स्वातंत्र्यसेनानींची वेशभूषा करता येऊ शकते, हे पाहू. भगतसिंग- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग (Bhagat Singh) यांचं बलिदान खूप मोलाचं आहे. त्यांच्या शौर्याच्या गाथा, बलिदानाची कथा आजवर आपण ऐकली आहे. त्यांची वेशभूषा साकारायची असेल, तर काळी हॅट, मिशा, साधा शर्ट आणि खाकी पँट या गोष्टी पुरेशा आहेत; मात्र जोशपूर्ण हावभाव चेहऱ्यावर दिसले पाहिजेत. ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घोषणा वेशभूषेला पूरक ठरेल. महात्मा गांधी- महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अनभिज्ञ असलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्यांचे विचार, तत्त्वज्ञान तर प्रसिद्धच आहे; पण पेहराव, चष्मा, बोलणं याबद्दलही खूप माहिती पुस्तकं, चित्रपटांमधून मिळाली आहे. त्यांच्यासारखी वेशभूषा करताना पांढरं धोतर, गोल फ्रेमचा चष्मा, काठी आणि टक्कलचा विग गरजेचा आहे. गांधीजींसारखं काठी हातात धरून चालत जाण्यानं वेशभूषा परिपूर्ण ठरेल. झाशीची राणी- देशाच्या इतिहासात 1857च्या स्वातंत्र्यसमराला खूप महत्त्व आहे. तिथूनच स्वातंत्र्यलढ्याची पाळंमुळं रुजवली गेली. ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Laxmibai) यांची वेशभूषा करताना महाराष्ट्रीय पद्धतीची नऊवारी साडी व पारंपरिक दागिने गरजेचे आहेत. त्यासोबत एक तलवार आणि ढाल यांच्या साह्याने लढवय्या राणीची वेशभूषा पूर्ण करता येईल. हेही वाचा- Independence Day Look : स्वातंत्र्यदिनाला परफेक्ट लूक हवाय? फॉलो करा या मेकअप टिप्स नेताजी सुभाषचंद्र बोस- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchandra Bose) यांचं योगदान मोलाचं आहे. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ ही त्यांची घोषणा स्वातंत्र्यसैनिकांना बळ देणारी ठरली. नेताजींप्रमाणे वेशभूषा साकारायला करड्या रंगाचा गणवेश घातला पाहिजे. त्यावर बिल्ले लावून सोनेरी रंगाच्या काड्यांचा गोल चष्मा व नेताजींसारखी टोपी यांमुळे वेशभूषा उठावदार होईल. लोकमान्य टिळक- लोकमान्य टिळकांचं (Bal Gangadhar Tilak) स्वातंत्र्यलढ्यात फार मोठं योगदान आहे. त्यांच्यासारखी वेशभूषा करताना पांढऱ्या रंगाचं धोतर व सदरा आणि त्यावर एक उपरणं आणि टिळकांची पगडी असलीच पाहिजे. तसंच ही वेशभूषा मोठ्या झुपकेदार मिश्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू- पंडित नेहरूंची (Jawaharlal Nehru) वेशभूषा सहज व सोपी आहे. पांढरा सदरा व पायजमा त्यावर खास नेहरू जॅकेट असा त्यांचा पेहराव करता येईल. पंडित नेहरूंची ओळख म्हणजे कोटाला असलेलं लाल गुलाबाचं फूल. त्यांची विशेष टोपीदेखील हवीच.
    First published:

    Tags: Independence day, New look

    पुढील बातम्या