जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काय म्हणताय! साड्या वाढवणार रोगप्रतिकारक शक्ती; कोरोनापासून बचाव करण्यात मदत करणार

काय म्हणताय! साड्या वाढवणार रोगप्रतिकारक शक्ती; कोरोनापासून बचाव करण्यात मदत करणार

काय म्हणताय! साड्या वाढवणार रोगप्रतिकारक शक्ती; कोरोनापासून बचाव करण्यात मदत करणार

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांबाबत तर आतापर्यंत आपण ऐकलं आहे मात्र अशा साड्या कधी पाहिल्यात का?

  • -MIN READ
  • Last Updated :

पूजा माथुर/भोपाळ, 20 ऑगस्ट : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, हँड वॉशचा वापर केला जातो आहे. याशिवाय कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे ही रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. मध्य प्रदेशमध्ये  (Madhya Pradesh) काढा, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांचं सेवन करण्याचा सल्ला देत आहे. अशात आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे ते म्हणजे साडी (saree) मध्य प्रदेश सरकारने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी (immunity booster saree) साडी लाँच केली आहे.  ऐकून थोडं आश्चर्यच वाटेल. मात्र ही साडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून व्हायरस आणि बॅक्टेरियांपासून बचाव करण्यात मदत करेल, असा दावा केला जातो आहे. या हर्बल आणि इम्युनिटी बुस्टर साड्यांना आयुर्वस्त्र असं नाव देण्यात आलं आहे. कशा तयार केल्या जातात इम्युनिटी बुस्टर साड्या? साड्या तयार करण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जातो. यामध्ये लवगं, मोठी वेलची, छोटी वेलची, चक्रीफूल, जावित्री, दालचिनी, काळी मिरी, शाही जिरा, तमालपत्र यांचा समावेश आहे. सर्व मसाले बारीक कुटून 48 तासांपेक्षा जास्त वेळ एका कापडात गुंडाळून एका भांड्यात पाण्यात टाकलं जातं आणि भट्टीवर हे पाणी उकळलं जातं. त्यानंतर ज्या साडीच्या कापडाला कित्येक तास या वाफेने प्रक्रिया केली जाते. एक साडी तयार करण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात. हे वाचा -  एका छोट्या पॅकेटची मोठी कमाल, कोरोनापासून करतो बचाव; दाव्याबाबत FACT CHECK मध्य प्रदेशच्या हातमाग आणि हस्तकला महामंडळाचे आयुक्त राजीव शर्मा यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, “प्राचीन काळात ऋषीमुनींच्या निरोगी स्वास्थ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या वस्त्रांची प्राचीन विद्या आणि परंपरेला पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळाली आहे. कोरोना काळात दोन महिने ट्रायल करण्यात आलं त्यानंतर योग्य तो मार्ग काढून मसल्यांपासून मिश्रण तयार करण्यात आलं आणि त्यानंतर हे आयुर्वस्त्र तयार करण्यात आलं आहे” साड्या वापरताना काय काळजी घ्यावी? या साड्यांवर वेगवेगळ्या मसाल्यांची प्रक्रिया करण्यात आली आहे. साड्यांचा परिणाम चार ते पाच वॉशपर्यंतच राहतो. त्यामुळे साड्या धुण्यासाठी कमी केमिकलयुक्त पावडरचा वापर करावा. जेणेकरून त्याचा परिणाम जास्त दिवस राहिल असा सल्ला दिला जातो. हे वाचा -  भारतात आणखी एका लशीचं उत्पादन होणार, ‘या’ कंपनीसोबत झाला करार या साड्यांची किंमत तीन ते चार हजार रुपये आहे. सध्या या साड्यांची विक्री भोपाळ आणि इंदोरमध्ये होते आहे. लवकरच देशातील इतर शहरांपर्यंत या साड्या पोहोचवण्याचं लक्ष्य आहे. संक्रमणापासून वाचण्याचा हा एक प्राचीन उपाय आहे, असं शर्मा यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: saree
  • First Published :
जाहिरात
जाहिरात