aनवी दिल्ली, 23 एप्रिल: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Increasing **Prevalence of Corona)** पाहता इम्युनिटी वाढवण्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेच झालं आहे. मास्क घालणं, वेळोवेळी हँडवॉश किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं आता आवश्यक बनलं आहे. त्याचप्रमाणे हेल्दी जेवण (Healthy food) आणि रोगप्रतिकार शक्ती (Immunity) मजबूत ठेवण्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे. उन्हाळ्यात सतत पाणी प्यायल्यामुळे जेवण कमी होतं. पण शरीराला पोषक तत्वांची (Nutrients to the body) आवश्यता तर असतेच. त्यामुळे हलक्या पदार्थांचा आहाराचा समावेश असावा. आहाराता डाळीचा समावेश करावा. डाळ एकप्रकारे इम्युनिटी बुस्टर आहे. डाळीच पाणी पौष्टीक आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचं पाणी पिऊ शकता. डाळीच्या पाण्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेड आणि फॉस्फरस असतं. या पाण्यामुळे एनेमियाचा त्रास कमी होतो. कोरोना काळात जर दररोज एक कप डाळीचं पाणी प्यायल्यास, तुमच्या शरीरात तयार झालेले अनवाश्यक घटक निघून जातात आणि तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल.
Cororna काळात ‘कप डाळीचं पाणी’ वाढवेल Immunity
काय आहेत डाळ पाणी पिण्याचे फायदे ? -डाळ पाण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि शरीरातून पारा आणि शिसं सारख्या जड धातूंचा निचरा होतो. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम असतंच. त्याबरोबर व्हिटॅमिन-सी,कार्ब्स आणि प्रोटीन्स आणि डायटरी फायबर देखील असतात. याचे ग्लाइसेमिक इंडेक्ससुद्धा खूप कमी आहेत. -डाळीच्या पाण्यात थोडसं तूप घातल्यास चवतर वाढतेच पण पौष्टिक मूल्यही वाढतात. डाळीचे पाणी शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवते आणि उष्णतेमुळे होणार्या समस्याही होत नाहीत. -डाळीचं पाणी शरीरात एनर्जी बॅलन्स करते. डाळीचं पाणी फ्रीजमध्ये ठेवल्याने पोषक तत्व संपत नाहीत. त्यांमुळे थंड झाल्यावरही पिऊ शकता. (हे वाचा- Oxygen tanker missing: कोरोना महामारीत नवं संकट; ऑक्सिजन टँकरच रस्त्यातून गायब ) -जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात डाळीच्या पाण्याचा समावेश करा. त्यामुळे कॅलरीज वाढतातच त्यासोबत भूकेवरही नियंत्रण राहते. -उन्हाळ्यात बर्याच वेळा भरपूर घाम येतो,ज्यामुळे रोगप्रतीकार शक्ती कमकुवत होऊ लागते. त्यावेळी डाळ पाणी पिण्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. -डाळीचं पाणी सहज पचतं. हे शरीर आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. हलकं असल्यामुळे शरीरात वायू तयार होतो. पोटाच्या समस्येपासून मुक्तता मिळते. -लूज मोशन होत असतील तर, एक वाटी डाळ पाणी प्याल्याने आराम मिळतो. शरीरातील पाण्याची कमतरताच पूर्ण करण्याबरोबर लूज मोशनही कमी होतात.