जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनात नवा कहर! रिफायनरीतून निघालेला ऑक्सिजन भरलेला टँकर अचानक गायब, चालकही बेपत्ता

कोरोनात नवा कहर! रिफायनरीतून निघालेला ऑक्सिजन भरलेला टँकर अचानक गायब, चालकही बेपत्ता

Oxygen - Representative Image

Oxygen - Representative Image

Oxygen tanker missing: ऑक्सिजनने भरलेला टँकर वाटेतूनच गायब झाल्याचा धक्दाकायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल: संपूर्ण देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) जाणवत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी उपलब्ध असेल अशा ठिकाणांहून रुग्णालयांत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, असे असताना आता ऑक्सिजन टँकरच वाटेतून गायब (Oxygen tanker missing) झाल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरियाणातील (Haryana) पानिपत (Panipat) रिफायनरीमधून सिरसा येथे टँकरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, रिफायनरीतून निघालेला हा टँकरच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी बोहली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा टँकर पानिपत येथून सिरसा येथे पाठवण्यात येत होता मात्र, प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचलाच नाही. आधीच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना आता ऑक्सिजन टँकर गायब झाल्याची घटना समोर आल्याने प्रशासनासह पोलिसही अचंबित झाले आहेत. हा टँकर पंजाबमधील पासिंगचा असून टँकरसोबतच चालकही बेपत्ता आहे. वाचा:  कोविडच्या लढाईत वायूसेना मदतीला सरसावली; ऑक्सिजन कंटेनरची केली हवाई वाहतूक पानिपत रिफायनरीमध्ये एअर लिक्विड नॉर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करते. येथून बुधवारी रात्री ऑक्सिजनने भरलेला एक टँकर सिरसाच्या दिशेने पाठवण्यात आला होता. या टँकरमध्ये आठ टन 82 किलो ऑक्सिजन होता. ज्या किंमत जवळपास एक लाख दहा हजारांच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. पानिपतहून सिरसा पर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास चार तास लागतात. मात्र, टँकर सिरसाला पोहोचलाच नाही त्यानंतर पानिपत येथील कंपनीत संपर्क साधण्यात आला आणि संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. टँकर चालकाचाही फोन बंद आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच टँकर चालकाचे अंतिम लोकेशन आणि कॉल डिटेल्स सुद्धा तपासण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात