मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सोडली 14 लाखाची नोकरी, आता फक्त ‘पोज’ देऊन करते करोडोंची कमाई

सोडली 14 लाखाची नोकरी, आता फक्त ‘पोज’ देऊन करते करोडोंची कमाई

Rhiannon Blue या तरुणीचं आयुष्य दोन वर्षांपूर्वी पूर्ण पालटून गेलं. तिनं तिची नोकरी सोडली आणि कोट्यवधींची कमाई सुरू झाली.

Rhiannon Blue या तरुणीचं आयुष्य दोन वर्षांपूर्वी पूर्ण पालटून गेलं. तिनं तिची नोकरी सोडली आणि कोट्यवधींची कमाई सुरू झाली.

Rhiannon Blue या तरुणीचं आयुष्य दोन वर्षांपूर्वी पूर्ण पालटून गेलं. तिनं तिची नोकरी सोडली आणि कोट्यवधींची कमाई सुरू झाली.

aती मुलगी एकेकाळी आपल्या आईच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडायची. आपलं श्रीमंत होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल का, याची सतत तिला चिंता असायची. तिच्याकडे एक नोकरी तर होती. मात्र त्या नोकरीत तिचं आयुष्य हे एखाद्या मध्यमवर्गीयाचं आयुष्य असतं, त्याप्रमाणे होतं. त्या आयुष्यात ती समाधानी नव्हती. तिची स्वप्नं मोठी होती. मग एक दिवस तिला एका वेबसाईटवर एक जाहीरात दिसली आणि तिचं नशीब पालटलं.

Rhiannon Blue या तरुणीचं आयुष्य दोन वर्षांपूर्वी पूर्ण पालटून गेलं. तिनं तिची नोकरी सोडली आणि कोट्यवधींची कमाई सुरू झाली. तिनं स्वतःच्या आवडीचा चार बेडरुमचा फ्लॅटही बुक केला आणि तोदेखील आईवडिल किंवा इतर कुणाच्याही आर्थिक मदतीविना. ही किमया घडली ऑनलाईन फोटो सेलिंग साईट OnlyFans मुळं. तिला इन्स्टाग्रामवर काही मित्रांची पोस्ट पाहून या वेबसाईटविषयी समजलं. आपले काही विशिष्ट पोजमधले फोटो या वेबसाईटला द्यायचे आणि त्याला लोकांची जितकी पसंती मिळेल, तितके पैसे आपल्याला मिळतात, हे तिनं वाचलं.

तिनं स्वतःचे काही फोटो काढले आणि ते या साईटवर अपलोड केले. पहिल्यांदा अपलोड केलेल्या तिच्या फोटोला नेटिझन्सची जोरदार पसंती मिळाली. त्यानंतर तिनं प्रोफेशनल फोटोशूट करून फोटो अपलोड करायला सुरुवात केली. बघता बघता तिचे फोटो प्रचंड लोकप्रिय होत गेले आणि वेबसाईटकडून तिला मिळणारं मानधन वाढत गेले. एकेकाळी ती वर्षाला जितका पगार मिळवायची, तितकं मानधन तिला महिन्याकाठी येऊ लागलं. त्यातून तिनं स्वतःचं घराचं स्वप्न पूर्ण केलं.

भारतीय चलनानुसार Rhiannon ला वर्षाकाळी 14 लाख रुपये पगार मिळायचा. मात्र आता ती दरमहा 15 ते 22 लाख रुपये कमावते.

First published:
top videos

    Tags: Bold photoshoot, Model