Home /News /lifestyle /

Diabetes रुग्णांसाठी रामबाण इलाज आहेत या 4 गोष्टी; शुगर पातळीत दिसेल जबरदस्त परिणाम

Diabetes रुग्णांसाठी रामबाण इलाज आहेत या 4 गोष्टी; शुगर पातळीत दिसेल जबरदस्त परिणाम

हा आजार पूर्णपणे जीवनशैलीशी संबंधित आहे. तुमचा आहार आणि जीवनशैली योग्य नसेल तर मधुमेह होण्याची शक्यता वाढते. जीवनशैलीत बदल करूनही त्यावर नियंत्रण ठेवता येतं.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीतही काही छोटे बदल करून मधुमेहावर नियंत्रण (Diabetes Control) ठेवता येतं. ज्या लोकांच्या रक्तातील साखरेचं (Blood Sugar) प्रमाण जास्त असतं, त्यांनी औषधं घेण्यासोबतच इतर गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे. हे लोक त्यांच्या आहारात काही मसाले आणि औषधी वनस्पतींचा समावेश करू शकतात; ज्यांच्यामुळं त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. मधुमेह (Diabetes) हा अलिकडे एक सामान्य आजार बनला आहे. तरुण वयातील रुग्णांचीही संख्या वाढत आहे. हा आजार पूर्णपणे जीवनशैलीशी संबंधित आहे. तुमचा आहार आणि जीवनशैली योग्य नसेल तर मधुमेह होण्याची शक्यता वाढते. जीवनशैलीत बदल करूनही त्यावर नियंत्रण ठेवता येतं. ज्या लोकांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यांना औषधं घ्यावीच लागतात. औषध आणि अन्नाव्यतिरिक्त, काही मसाले आणि औषधी वनस्पतीदेखील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात, अशी माहिती 'आज तक'नं दिली आहे. कडुलिंब (Neem) - कडुलिंब ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती असून त्याच्या बहुसंख्य औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यापासून ते दात आणि त्वचेची काळजी घेण्यापर्यंत कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. कडुनिंबात फ्लेव्होनॉइड्स, ग्लायकोसाइड्स आणि ट्रायटरपेनॉइड्स देखील असतात. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर दिवसातून 2 वेळा कडुनिंबाची पानं किंवा त्याच्या रसाचं सेवन करावं. आलं (Ginger) - आलं जवळपास प्रत्येक घरात असतं. याच्या सेवनामुळं शरीर आतून उबदार राहतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आलं इन्सुलिन स्राव नियंत्रित करण्यासही मदत करतं. कच्चं आलं किंवा सुंठ (कोरडं आलं) जास्त फायदेशीर आहे. मात्र, याचं जास्त सेवन करू नये. अन्यथा, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. हे वाचा - Winter Health: थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा मेथी (Fenugreek) - मेथी मधुमेहावरील नियंत्रणासाठी खूप गुणकारी आहे. ही शरीरातील ग्लुकोज टॉलरन्स सुधारण्यास मदत करते. यामध्ये विरघळणारं फायबर मुबलक प्रमाणात असतं, जे पचन मंद करून रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. मेथीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात; जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. मधुमेहाच्या रुग्णांना दररोज 10 ग्रॅम मेथी खाण्याचा सल्ला दिला जातो. हे वाचा - Immunity Booster Fruits: शरीराची Immunity वाढवण्यासाठी औषधे नकोत, खा ही 7 फळं; आजार राहतील कोसो दूर दालचिनी (Cinnamon) - दररोज दालचिनी खाल्ल्यानं मधुमेह दूर ठेवता येतो. दालचिनी हा मसाला जेवणाची स्वाद वाढवण्याचं काम करतो. शिवाय, याचे आयुर्वेदिक गुणधर्म इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम करतात आणि इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. तुम्ही याचा चहा बनवून किंवा पाण्यात उकळूनही पिऊ शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Diabetes, Tips for diabetes

    पुढील बातम्या