जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ‘आरओ फिल्टर’चं पाणी पीत असाल तर या गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक

‘आरओ फिल्टर’चं पाणी पीत असाल तर या गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक

RO पाणी

RO पाणी

आजच्या घडीला घरोघरी स्वच्छ पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पाण्यातले दूषित घटक काढण्यासाठी नागरिक आरओ फिल्टरवर अवलंबून राहत आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 जानेवारी : सध्याच्या काळात फिल्टरचं पाणी वापरण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. घरोघरी आता फिल्टर्ड पाण्याचे जार उपलब्ध केले जात आहेत. हे पाणी शुद्ध आणि आरोग्यासाठी उत्तम असल्याने यावर बराच पैसाही खर्च केला जातो. परंतु, आरओ फिल्टरच्या माध्यमातून पाणी शुद्ध करताना काही बाबींची तपासणी केली जाणं आवश्यक आहे. पाण्यात समाविष्ट असलेल्या घटकांचं प्रमाणही पाहावं लागतं. पाणी फिल्टर करण्याच्या नावाखाली त्यात आवश्यक असणारे घटक नाहीसे तर होत नाहीत याची काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. ‘ टीव्ही नाइन हिंदी ’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. आजच्या घडीला घरोघरी स्वच्छ पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पाण्यातले दूषित घटक काढण्यासाठी नागरिक आरओ फिल्टरवर अवलंबून राहत आहेत. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक घरात आरओ फिल्टर लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे पाणी स्वच्छ करून ते पाणी गोडं केलं जातं. पाणी शुद्ध करण्याच्या या प्रक्रियेशी ‘टीडीएस’ ही एक तांत्रिक बाब जोडली गेली आहे. पाण्याच्या टीडीएसवरून त्याच्या शुद्धतेचं मोजमाप केलं जाऊ शकतं. या टीडीएसबद्दल अधिक जाणून घेऊ या. पाण्यातल्या टीडीएसचं प्रमाण किती असणं आवश्यक पाण्यात विरघळलेले एकूण घनपदार्थ यालाच टीडीएस म्हणजेच Total Dissolved Solids असं म्हटलं जातं. सद्यस्थितीत पाणी शुद्ध करण्यासाठी अनेक वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. परंतु पाणी स्वच्छ करण्यासाठी एक मर्यादा घालून दिलेली आहे. तज्ज्ञांच्या मते, पाण्याचा टीडीएस 500पेक्षा कमी असेल तर ते पाणी पिण्यायोग्य आहे. यापेक्षा अधिक टीडीएस असणारं पाणी आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. हे वाचा -  हिरव्या मटारचे एवढे फायदे वाचून थक्क व्हाल! शरीराच्या या समस्यांपासून देते आराम डब्ल्यूएचओ म्हणते आरओ फिल्टरच्या माध्यमातून पाणी स्वच्छ करताना काही तांत्रिक बाबी आवश्यक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. डब्ल्यूएचओनुसार, पाण्याचा टीडीएस 300 मिलिग्रॅमपेक्षा कमी असायला हवा. तज्ज्ञांच्या मते, टीडीएसची पातळी 900पेक्षा अधिक असेल तर असं पाणी कदापि पिऊ नये. हे वाचा -  आवडत नसलं तरी खायला हवं बीट; थायरॉईडसारख्या आजारांवर असा होतो परिणाम 100च्या खाली टीडीएस असणंही नुकसानकारक

News18लोकमत
News18लोकमत

आरओ फिल्टर आज प्रत्येक घराची गरज बनला आहे. परंतु आरओ फिल्टरमधून शुद्ध केल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये टीडीएसचं प्रमाण 100पेक्षा कमी असायला नको. अनेक कुटुंबांमध्ये टीडीएस 65 ते 95 वर ठेवले जाते. यामुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. आरओ फिल्टरचं पाणी विकणारे बहुतांश व्यावसायिक पाणी गोडं करून विकतात. त्यामुळे त्यातली आवश्यक मिनरल्स आणि खनिजं नाहीशी होतात. परिणामी शरीरातल्या हाडांचं नुकसान होऊ शकतं. कालांतराने हाता-पायांचे सांधे दुखू लागतात. तज्ज्ञांच्या मते, पाण्यातल्या टीडीएसची पातळी 350 पर्यंत असायला हवी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात