मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जगात कुणालाही शक्य झालं नाही ते एका भारतीयाने केलं; 161 वर्षांपासूनचं गणिताचं अवघड कोडं सोडवलं

जगात कुणालाही शक्य झालं नाही ते एका भारतीयाने केलं; 161 वर्षांपासूनचं गणिताचं अवघड कोडं सोडवलं

क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ऑफ केम्ब्रिज या संस्थेने जगातल्या आतापर्यंत सोडवता न आलेले सात कूटप्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी एक दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवलं आहे. त्या सात प्रश्नांपैकी एक प्रश्न रिमान हायपोथेसिस हा आहे.

क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ऑफ केम्ब्रिज या संस्थेने जगातल्या आतापर्यंत सोडवता न आलेले सात कूटप्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी एक दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवलं आहे. त्या सात प्रश्नांपैकी एक प्रश्न रिमान हायपोथेसिस हा आहे.

क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ऑफ केम्ब्रिज या संस्थेने जगातल्या आतापर्यंत सोडवता न आलेले सात कूटप्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी एक दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवलं आहे. त्या सात प्रश्नांपैकी एक प्रश्न रिमान हायपोथेसिस हा आहे.

हैदराबाद, 30 जून: 161 वर्षांमध्ये कोणालाही सोडवता न आलेला रिमान हायपोथेसिस (Riemann Hypothesis) हा गणितीय कूटप्रश्न (Mathematical Problem) सोडवल्याचा दावा हैदराबादस्थित गणितीय भौतिकशास्त्रज्ञ (Mathematical Physicist) कुमार ईश्वरन (Kumar Eswaran) यांनी केला आहे. जॉर्ज फ्रेडरिक बर्नहार्ड रिमान (1826 - 1866) या जर्मन गणितज्ञाने सर्वांत पहिल्यांदा 1859 मध्ये रिमान हायपोथेसिसची मांडणी केली. क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ऑफ केम्ब्रिज या संस्थेने जगातल्या आतापर्यंत सोडवता न आलेले सात कूटप्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी एक दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवलं आहे. त्या सात प्रश्नांपैकी एक प्रश्न रिमान हायपोथेसिस हा आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबादमधल्या श्रीनिधी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत मॅथेमॅटिकल फिजिसिस्ट म्हणून कार्यरत असलेले कुमार ईश्वरन यांनी 'दी फायनल अँड एक्झॉस्टिव्ह प्रूफ ऑफ रिमान हायपोथेसिस फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल्स' (The final and exhaustive proof of the Riemann Hypothesis from first principles) हा त्यांचा संशोधनविषयक अहवाल पाच वर्षांपूर्वीच इंटरनेटवर प्रसिद्ध केला आहे; मात्र सविस्तर पीअर रिव्ह्यू (Peer Review) अर्थात अन्य शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून या संशोधनाचा आढावा/परीक्षण घेऊन ते प्रसिद्ध करण्याकडे आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे संपादक दुर्लक्ष करत आहेत.

हे वाचा - ऍक्युप्रेशर आणि ऍक्युपंक्चर; खरंच चिनी प्राचीन उपचार पद्धतीने बरे होतात आजार?

'डेक्कन क्रॉनिकल'शी बोलताना ईश्वरन यांनी सांगितलं, 'महान गणितज्ज्ञ जॉर्ज फ्रेडरिक बर्नहार्ड रिमान (Georg Friedrich Bernhard Riemann) यांनी 19 व्या शतकात दिलेला फॉर्म्युला मी 2016 मध्ये सोडवला आहे. त्यावर मी सहा आठवडे काम केलं. या विषयातल्या तज्ज्ञांकडून परीक्षण होण्यासाठी मी तो इंटरनेटवर प्रसिद्ध केला. 2018-19 मध्ये मी या विषयावर अनेक व्याख्यानंही दिली.'

ईश्वरन यांनी तयार केलेला हा संशोधन अहवाल हजारो जणांनी डाउनलोड केला. त्यानंतर 2020 साली आठ गणितज्ज्ञ आणि थेरॉटिकल फिजिसिस्ट्स यांची तज्ज्ञ समिती तयार करण्यात आली.

'एक ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या (Prime Numbers) कोणीही सहजपणे सांगू शकतं. पण 10 लाख किंवा 10 अब्जपर्यंत किती आणि कोणत्या मूळ संख्या आहेत याचं गणित मांडणं अवघड आहे. रिमान हायपोथेसिस सोडवणं महत्त्वाचं होतं. कारण त्यामुळे गणितज्ज्ञांना मूळ संख्या नेमकेपणाने मोजणं शक्य होणार आहे,' असं ईश्वरन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

हे वाचा - तुमचं टॅलेंट दाखवण्याची संधी; Abir India संस्थेने या कलांसाठी मागवल्या प्रवेशिका

'रिसर्च मॅटर्स'मधल्या वृत्तानुसार, तांत्रिक दृष्टीने पाहिलं असता रिमान हायपोथेसिस हे L-Functions चा अंतर्भाव असलेल्या समीकरणांच्या उत्तरांबद्दलचं भाकीत आहे. त्यांचं वर्णन Esoteric आणि Abtruse असं करता येऊ शकतं.

तज्ज्ञ समितीने 1200हून अधिक गणितज्ज्ञांना ईश्वरन यांच्या संशोधन अहवालाच्या आढाव्यासाठी, मतप्रदर्शनासाठी आमंत्रित केलं. त्यापैकी सात आंतरराष्ट्रीय स्कॉलर्सनी वेळेत प्रतिसाद दिला. 'युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास'च्या थेरॉटिकल फिजिक्स विभागातून निवृत्त झालेले प्रा. एम. सीतारामन यांनीही ईश्वरन यांच्या संशोधन अहवालाचं परीक्षण केलं. 'ईश्वरन यांनी केलेलं विश्लेषण सखोल आणि निःसंदिग्ध आहे. विश्लेषणातला प्रत्येक मुद्दा अत्यंत बारकाईने आणि विस्तृतपणे समजावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी काढलेले निष्कर्ष मान्य केले पाहिजेत,' असं प्रा. सीतारामन यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं.

First published:

Tags: Hyderabad, Intelligence, Lifestyle, Maths, Problems