जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Howrah Bridge : रात्री 12 वाजेनंतर का बंद केला जातो हावडा ब्रिज, यामागे अंधश्रद्धा की वैज्ञानिक कारण

Howrah Bridge : रात्री 12 वाजेनंतर का बंद केला जातो हावडा ब्रिज, यामागे अंधश्रद्धा की वैज्ञानिक कारण

हावडा पूल 12 वाजता काही काळासाठी बंद केला जातो.

हावडा पूल 12 वाजता काही काळासाठी बंद केला जातो.

कोलकाता येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. प्रत्येक वास्तूची वेगळी कथा आहे. यापैकी एक म्हणजे हुगळी नदीवर बांधलेला हावडा ब्रिज किंवा पूल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 जून : कोलकाता शहर हे भारतातील सध्याच्या मेट्रो शहरांपैकी एक आहे. या शहराचा इतिहास खूप जुना आहे. येथे अनेक ऐतिहासिक वास्तूही आहेत. प्रत्येक वास्तूची वेगळी कथा आहे. यापैकी एक म्हणजे हुगळी नदीवर बांधलेला हावडा ब्रिज किंवा पूल. कोलकात्याला भेट दिली असेल तर हावडा ब्रिज नक्कीच पाहिला असेल. हा पूल अतिशय सुंदर आणि लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. दररोज सुमारे 1 लाख वाहने आणि सुमारे 1.5 लाख पादचारी या पुलावरून हुगळी नदी ओलांडतात. पण तुम्हाला माहीत आहे का लाखो लोकांची ये जा असलेला हा पूल रात्री 12 वाजता बंद केला जातो. काही लोकांची अशी मान्यता आहे की या ठिकाणी अनेक लोकांनी जीव गमावल्यामुळे या पुलावर रात्री भुतांचा वास असतो. मात्र हा रात्री बंद ठेवण्यामागचे नेमके कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हावडा पूल 12 वाजता काही काळासाठी बंद केला जातो. कारण यावेळी पूल कोसळण्याचा धोका जास्त असल्याचे स्थानिकांचे मत आहे. ब्रिटीशांनी बांधलेला हा पूल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. 12 वाजता पुलाखालील ट्रेन, कार आणि बोट काही काळ थांबल्याचं सांगण्यात येतं. हावडा ब्रिज हा पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर पसरलेला कॅन्टिलिव्हर पूल असल्याचे म्हटले जाते. हा पूल 280 फूट उंचीच्या दोन खांबांवर उभा आहे आणि या खांबांमधील अंतर दीड हजार फूट आहे. त्यामुळे वजन जास्त असल्याने अनेकदा पूल कोसळण्याचा धोका असतो. हा पूल बांधल्यानंतर हावडा पुलाच्या अभियंत्यांनी सांगितले होते की, हा खांब कधी पडला तर तो 12 वाजताच पडेल. हावडा पुलाचा इतिहास खूप जुना आहे. त्यात महायुद्ध आणि अनेक साथीचे रोगही पाहिले आहेत. याशिवाय या पुलावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. लाखो लोक पायीही पूल ओलांडतात. हा पूल व्यावसायिक हेतूने बांधण्यात आला होता. त्यानंतर या पुलावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या पुलाला अनेक दिव्यांनी सजवण्यात आले आहे, ज्यामुळे त्याचे सौंदर्य वाढते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात