मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आकडे पाहुन धडकी भरते? वीजबिल कमी करण्यासाठी या टिप्स वापरून पहा

आकडे पाहुन धडकी भरते? वीजबिल कमी करण्यासाठी या टिप्स वापरून पहा

वीजबील कमी करण्याच्या टिप्स

वीजबील कमी करण्याच्या टिप्स

विजेचा योग्य वापर करून वाढत्या बिलावर नक्कीच नियंत्रण ठेवता येऊ शकतं. ऊर्जेची बचत करण्यासाठी विजेचा योग्य वापर केल्यास बिलात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. त्यासाठीच्या टिप्स पाहुया.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Kolhapur, India

मुंबई, 29 ऑक्टोबर : सध्या भरमसाठ वीज बिलांमुळे ग्राहकांची चिंता वाढल्याचं दिसून येत आहे. या महागाईच्या काळात वाढत्या वीजबिलाचा झटका नागरिकांना सहन होत नाही. विजेचे वाढते दर आणि जास्त वापर यामुळे बिल वाढत आहे. विजेचे दर कमी करणं सर्वसामान्यांच्या हातात नाही; पण विजेचा योग्य वापर करून वाढत्या बिलावर नक्कीच नियंत्रण ठेवता येऊ शकतं. ऊर्जेची बचत करण्यासाठी विजेचा योग्य वापर केल्यास बिलात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. घर आणि ऑफिसमध्ये अनेक छोटे-मोठे बदल करून तुम्ही विजेची बचत करू शकता. एका अभ्यासानुसार, रूमच्या हीटिंग आणि कूलिंगसाठी 80 टक्के घरगुती विजेचा वापर होतो.

एलईडी बल्बचा करा वापर

तुम्ही अजूनही जुन्या प्रकारचे साधे बल्ब आणि ट्यूबलाइटचा वापर करत असाल तर आता त्याऐवजी एलईडी लाइट्सचा वापर सुरू करा. कारण यामुळे तुम्हाला सामान्य बल्बपेक्षा जास्त प्रकाश मिळतो आणि त्यासाठी वीजदेखील कमी प्रमाणात वापरली जाते. घरातला एअर कंडिशनर अतिशय कमी तापमानावर किंवा खूप जास्त तापमानावर चालवू नका. वॉशिंग मशीनच्या क्षमतेनुसारच त्यात कपडे धुण्यासाठी टाका. याशिवाय कम्प्युटर किंवा टीव्ही विनाकारण आणि वापर नसताना सुरू ठेवू नका. तसंच ऊर्जेची बचत करण्यासाठी या उपकरणांमधल्या पॉवर सेव्हिंग मोडचा वापर करा.

वापर नसताना गीझर आणि हीटर चालू ठेवू नका

तुम्ही घरात गीझर आणि वॉटर किंवा रूम हीटर्स वापरत असाल, तर त्यांचं तापमान नेहमी कमी ठेवा. तसंच या उपकरणांचा वापर झाल्यानंतर ती लगेच बंद करा. कारण या उपकरणांसाठी जास्त वीज लागते. बऱ्याच वेळा या उपकरणांचा वापर केल्यानंतर ती बंद करायला विसरलं जातं. आता हिवाळा सुरू झाला आहे. या कालावधीत या उपकरणांचा वापर वाढणार आहे. त्यामुळे ही उपकरणं वापरताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे.

हे वाचा - WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी आता ब्लर करता येणार; कसं वापरता येईल हे फीचर

सौर पॅनेलचा वापर करा

घरात सौर पॅनेलचा वापर केल्यास विजेचा वापर निम्म्याहून कमी होऊ शकतो. या पॅनेलची किंमत जास्त असली तरी त्याच्या वापरामुळे विजेची बचत होते आणि त्याच्यासाठी केलेल्या खर्चाचीदेखील भरपाई होते. वीज बचतीसाठी हे नैसर्गिक ऊर्जेचं सर्वांत विश्वसनीय साधन आहे.

हे वाचा - ओला इलेक्ट्रिक कारबद्दल नवी माहिती समोर, कारला नसणार साइड मिरर

एनर्जी सेव्हिंग सॉकेट डिव्हाइसचा वापर करा

तुम्ही घरातले दिवे बंद करायला विसरत असाल, तर एनर्जी सेव्हिंग सॉकेट हे उपकरण तुमच्यासाठी उत्तम गॅजेट आहे. हे डिव्हाइस 230V 24×7 एनर्जी सेव्हिंग सॉकेट टाइप असून त्यात डिजिटल प्रोग्रामेबल इलेक्ट्रॉनिक टायमर देण्यात आला आहे. या सॉकेटमुळे तुम्हाला घरातली उपकरणं चालू किंवा बंद करण्यासाठी एक शेड्यूल सेट करता येऊ शकतं.

First published:

Tags: Electricity, Electricity bill