मुंबई, 18 डिसेंबर : साधारणतः वयाच्या साठीत पोचता-पोचता आपण हे स्वतःशी कबूल करतो, की आता निवांत आराम करण्याचे दिवस आले आहेत. हेच नाही तर समाजही आपल्याला याची जाणीव करून देतो, की आता दगदग करण्याचे, काम करण्याचे दिवस संपले आहेत. मात्र हे खरोखर असं नाही. उलट वयाच्या साठीतच ते वय सुरू होतं जेव्हा तुमच्यावरील सर्व जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. तुमच्यासाठी आता स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ असतो. मात्र हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही सक्रियपणे जगत असता. जाणून घ्या साठीनंतर कशाप्रकारे तुम्ही स्वतःला मस्त फिट ठेऊ शकता. (how to be fit in sixty) मनाला बनवा तरुण तुम्ही मनानं तरुण असाल तर तुमचं शरीरही तुम्हाला साथ देतं. मात्र तुम्ही मनात विचार केला असेल, की आता तुमचं वय या सगळ्यासाठी राहिलं नाही तर तुम्ही केवळ घर ते हॉस्पिटल अशा चकरा मारत रहाल. शरीर ठेवा फिट मनातून तरुण असण्याची गोष्ट तुम्ही एकदा स्वीकारली, की शरीराला हेल्दी आणि फिट ठेवणं सोपं होतं. निवृत्तीनंतर स्वतःच्या आरोग्यावर खर्च करा. खाणं-पिणं योग्य ठेवा. व्यायाम, योग आणि स्वीमिंग करा. तज्ञाचा सल्ला घ्या. एक नियमित रुटीन फॉलो करा. आनंदी आणि खुश दिसा. विश्वास ठेवा म्हातारपण जवळही येणार नाही. चेकअप गरजेचा लहानमोठा कुठलाही आरोग्याचा प्रॉब्लेम दुर्लक्षित करू नका. वर्षातून दोनदा संपूर्ण तपासणी करून घ्या. स्वतःवर केलेल्या खर्चाला अवास्तव खर्च मानू नका. वेळवर डॉक्टरांना समस्या सांगाल तर तुमचा खर्चही कमी होईल. मित्रांची सोबत गरजेची या वयातील लोकांची सर्वात मोठी समस्या आहे एकटेपण. अशात कुटुंबाच्या भरवशावर नका राहू. एक ग्रुप बनवा. त्यांच्यासोबत बागेत बसा, वॉक करा. विविध मजेदार गोष्टी करा. यातून तुम्ही आनंदी आणि उत्साही राहाल. हेही वाचा - बालपणापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत, प्रत्येक टप्प्यात कसा असावा महिलांचा आहार आहाराकडे लक्ष द्या तुम्हाला फिट रहायचं असेल तर खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या. च्या नुसार, चांगलं आरोग्य आणि ऊजा पाहिजे असेल तर डायटकडे लक्ष दिलं पाहिजे. जेवणात खूप फळं, हिरव्या भाज्या, मासे आणि होल ग्रेनचा समावेश करा. याशिवाय थोडेसे डेअरी प्रॉडक्ट्स आणि मांसही असू द्या. सॅच्युरेटेड फॅट टाळा. एका वयानंतर पचनशक्ती तेवढी चांगली राहत नाही. अशात डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शरीराला ठेवा हायड्रेटेड खूप पाणी पिणं अतिशय गरजेचं आहे. यातून शरीर हायड्रेटेड राहील. तुम्हाला थकवा येणार नाही. चहा, कॉफी किंवा ज्यूसही तुम्ही घेऊ शकता. मात्र साखर टाळा. अल्कोहोल टाळा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)