मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमचंही मुल बाहेर इतर मुलांना मारहाण करतंय का? या उपायांनी त्याला बनवा विनम्र

तुमचंही मुल बाहेर इतर मुलांना मारहाण करतंय का? या उपायांनी त्याला बनवा विनम्र

मुल शाळेतील किंवा परिसरातील कमकुवत किंवा लहान मुलांना मारत असेल किंवा घाबरवत असेल तर त्याला योग्य वयात या मार्गावर जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. अशी मुले त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर समाजाची डोकेदुखी ठरू शकतात.

मुल शाळेतील किंवा परिसरातील कमकुवत किंवा लहान मुलांना मारत असेल किंवा घाबरवत असेल तर त्याला योग्य वयात या मार्गावर जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. अशी मुले त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर समाजाची डोकेदुखी ठरू शकतात.

मुल शाळेतील किंवा परिसरातील कमकुवत किंवा लहान मुलांना मारत असेल किंवा घाबरवत असेल तर त्याला योग्य वयात या मार्गावर जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. अशी मुले त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर समाजाची डोकेदुखी ठरू शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India

मुंबई, 09 ऑक्टोबर : जन्मतःच कोणतीही मुलं इतरांना मारहाण करणारी, भांडखोर नसतात. मुलांवर त्यांच्या कुटुंबाचा आणि समाजावर मोठा प्रभाव पडतो. ज्या प्रकारची वागणूक त्यांच्याशी केली जाते, तसच ते इतरांशीही वागायला शिकतात. आपल्याकडून कोणावर अन्याय होईल, अशी वर्तणूक त्यांच्यासमोर करू नये. पण, तरीही मुल शाळेतील किंवा परिसरातील कमकुवत किंवा लहान मुलांना मारत असेल किंवा घाबरवत असेल तर त्याला योग्य वयात या मार्गावर जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. अशी मुले त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर समाजाची डोकेदुखी ठरू शकतात. जर तुमचे मूल इतर मुलांना मारत असेल किंवा वाईट वागणूक देत असेल तर तुम्ही त्यात सुधारणा कशी करू शकता, याविषयी जाणून (Parenting Tips) घेऊया.

दुर्बलांना मदत करण्यास शिकवा

शक्तिशाली असणे याचा अर्थ हुकूमशाही करणे किंवा इतरांवर वर्चस्व दाखवणे, असा होत नाही. अशा वेळी मुलांना शिकवा की दुर्बलांना मदत करणे हे बलवान लोकांचे काम आहे.

कॉम्प्रेशन शिकवा -

अनेकदा पालक किंवा शिक्षक मुलांची तुलना करतात आणि त्यांना नकारात्मक पद्धतीने स्पर्धा करायला शिकवतात. जे पुढे भांडण आणि आपापसात मारामारीचे कारण बनते. अशा परिस्थितीत स्पर्धेऐवजी कॉम्प्रेशन शिकवा. त्यांना दयाळू बनवा आणि त्यांना इतरांना मदत करण्यास शिकवा.

सहानुभूती दाखवू नका -

दादागिरी करणाऱ्या मुलांना कधीही सहानुभूती दाखवू नये. यामुळेच ते त्यांच्या चुका वारंवार करत राहतात आणि इतरांना त्रास देतात. जर तुमचा मुलगा असे करत असेल तर त्याला अजिबात सहानुभूती दाखवू नका, उलट तो कशी चूक करत आहे हे सांगा.

इतरांचा त्रास ओळखायला शिकवा -

तुमच्या मुलामध्ये धैर्य राखणे आदर्शदाच्या काही कल्पना रुजवण्याचा प्रयत्न करा. मुलाला इतरांच्या वेदना आणि दुःख समजण्यास शिकवा.

नम्रता शिकवा -

मुलांना कृतज्ञता आणि नम्रता शिकवणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या मुलाने काही चूक केली असेल तर त्याला सॉरी म्हणायला शिकवा आणि इतरांच्या मेहनतीचा आदर करा.

हिंसा सहन करू नका -

गुंडगिरी करणाऱ्या मुलांना फक्त हिंसेची भाषा कळते. त्यांच्याकडे सामाजिक कौशल्ये नसतात आणि प्रत्येकाला स्वतःहून कमी समजतात. अशा परिस्थितीत हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, याची जाणीव त्यांना करून द्या.

हे वाचा - जेवल्यानंतर लगेच का येते झोप? फक्त आळसच नाही तर हे आहे वैज्ञानिक कारण

योग्य आणि अयोग्य यातील फरक -

घरात योग्य-अयोग्य गोष्टींची चर्चा करा. योग्य गोष्टी स्वीकारण्याची आणि चुकीच्या गोष्टींसाठी सॉरी म्हणण्याची सवय घरातूनच सुरू होते. घरात चुकीचे समर्थन केले, तर मुलांमध्ये योग्य-अयोग्य फरक करण्याबाबत गोंधळ उडेल. म्हणून, योग्य आणि अयोग्य यातील फरक स्पष्टपणे शिकवा.

मुलाचे ऐका -

जर तुमचा मुलगा कोणाशी भांडून घरी आला असेल तर त्याच्यावर आरोप करण्यापूर्वी त्याची संपूर्ण कहाणी एकदा ऐका. यानंतरच योग्य-अयोग्याचा निर्णय द्या. पण, चुकीचे वागणे खपवून घेऊ नका.

First published:

Tags: Parents, Parents and child