Home /News /lifestyle /

तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता हँड सॅनिटायझर; कसं ते वाचा

तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता हँड सॅनिटायझर; कसं ते वाचा

त्याच बरोबर पेट्रोल पंप, फॅब्रिकेशन, वेल्डिंग होत असलेल्या ठिकाणां जवळ जात असतांना सॅनिटायझर जवळ बाळगणं धोक्याचं ठरू शकते.

त्याच बरोबर पेट्रोल पंप, फॅब्रिकेशन, वेल्डिंग होत असलेल्या ठिकाणां जवळ जात असतांना सॅनिटायझर जवळ बाळगणं धोक्याचं ठरू शकते.

कोरोनाव्हायरसपासून बचाव करणारं Hand sanitizer तुम्हीही बनवू शकता.

    मुंबई, 08 जून : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी हात स्वच्छ ठेवणं हा एक मार्ग आहे. घरी असताना आपण साबण आणि पाण्याने हात धुऊ शकतो. मात्र घराबाहेर अनेकदा ते शक्य होत नाही. त्यावेळी हँड सॅनिटायझर उपयोगी ठरतं. बाजारात विविध कंपन्यांचे हँड सॅनिटायझर (hand sanitizer) उपलब्ध आहेत. मात्र तुम्हीदेखील घरच्या घरी तुमचा हँड सॅनिटायझर बनवू शकता. घरच्या घरी हँड सॅनिटायझर कसा बनवावा याबाबत माय उपचारवर डॉ. आयुष पांडे यांनी याबाबत मार्गदर्शन केलं आहे. सर्वात आधी पाहुयात हँड सॅनिटायझर बनवण्यासाठी कोणत्या वस्तू लागतील. रबिंग अल्कोहोल - अल्कोहोल हाच हँड सॅनिटायझरचा मुख्य घटक आहे.  डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी रबिंग अल्कोहोल लावतात. हे तुम्हाला केमिस्ट शॉपमध्ये मिळेल. 99% वॉल्युमचं अल्कोहोल असावं. अॅलोविरा - अल्कोहोलमध्ये अॅलोविरा मिसळल्याने अल्कोहोलमुळे त्वचा कोरडी होत नाही.  तुम्ही तयार अॅलोविरा जेल वापरू शकता किंवा कोरफडीचा ताजा गरही घेऊ शकता. हे वाचा - भारीच आहे! Coronavirus पासून बचाव करणार 'हे' बूट सुगंधी तेल - टी ट्री ऑईल, लेव्हंडर ऑईल अशा तेलाचा वापर करा. यामुळे अल्कोहोलचा वास कमी होईल. हँड सॅनिटायझर बनवण्याची प्रक्रिया सॅनिटायझर बनवताना एक लक्षात ठेवा रबिंग अल्कोहोल आणि अॅलोविरा जेल यांचं प्रमाण 2:1 असावं. म्हणजे तुम्हाला 3/4 कप रबिंग अल्कोल लागेल आणि 1/4 कप अॅलोविरा जेल लागेल. असं प्रमाण घ्याल तर तुमच्या सॅनिटायझरमध्ये व्हायरसचा नाश करण्यासाठी आवश्यक असलेलं जवळपास 66% अल्कोहोल असेल आणि  7 ते 10 थेंब सुगंधी तेल घ्या. या सर्व वस्तू एका भांड्यात नीट मिक्स करा आणि एका छोट्या बाटलीत भरा. झालं तुमचं हँड सॅनिटायझर तयार. आता जेव्हा कधी तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर, शिंकताना-खोकताना तोंडावर हात धरल्यावर हे हँड सॅनिटायझर लावायला विसरू नका. हे वाचा - हँड सॅनिटायझरच्या परिणामाबाबत केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती संकलन, संपादन - प्रिया लाड घरच्या घरी मोज्यांपासूनही बनवू शकता मास्क, VIDEO पाहा
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Sanitizer

    पुढील बातम्या