नवी दिल्ली, 02 जून : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावाचा मार्ग म्हणजे हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणं आणि ते शक्य नसेल तेव्हा हँड सॅनिटायझर (hand sanitizer) वापरणं. मात्र हँड सॅनिटायझर वापरल्यामुळे त्वचेचे आजार तर बळावणार नाहीत ना, असा प्रश्न प्रत्येकाला पडला. किंबहुना अशा बातम्याही देण्यात आल्या. हँड सॅनिटायझरच्या दुष्परिणामबाबत अशाच एका बातमीबाबत केंद्र सरकारची नोडल एजन्सी पीआयबीने स्पष्टीकरण दिलं आहे.
50 ते 60 दिवस सातत्याने हँड सॅनिटायझर लावल्याने त्वचेचे आजार किंवा कॅन्सर होतो अशा आशयाची ही बातमी होती. मात्र ही बातमी चुकीची असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे.
Claim: A newspaper report states that continuous use of sanitizer for 50-60 days can lead to harmful skin disease & cancer
This information is false.Use of hand sanitizers does not harm humans. Hand sanitizers with 70% alcohol content is recommended for protection against #COVIDpic.twitter.com/QprHaHZELv
हँड सॅनिटायझरमुळे कोणताही त्वचेचा आजार किंवा कॅन्सर होत नाही. असं ट्विट PIB ने केलं आहे.हँड सॅनिटायझर माणसांसाठी घातक नाही. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी 70% अल्कोहोल असलेलं हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असं पीआयबीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.