आजकाल अनेक मुली त्यांचे डोळे हे सुंदर आणि रेखीव दिसावेत म्हणून डोळ्यांना काजळ आणि आयलायनर लावतात. सध्या यामध्ये जेल आयलायनर हा प्रकार ब्युटी प्रोडक्ट्समध्ये बराच ट्रेंडमध्ये आहे. परंतु काहीवेळी बाजारात मिळणारे जेल आयलायनरमध्ये हे अनेक केमिकल मिसळून बनवलेले असतात, अशावेळी जर हे आयलायनर एखाद्याच्या डोळ्यात गेले तर त्याने इंफेक्शन होण्याचा धोका असतो. तेव्हा तुम्हाला केमिकर फ्री जेल आयलायनर घरच्या घरी कसा बनवायचा हे जाणून घेऊयात. जेल आयलायनर बनवण्याची सामग्री : एक छोटा कंटेनर 2 ते 4 थेंब आय प्राइमर 2 ते 3 थेंब नारळाचे तेल
Banana Face Mask : केळ्याच्या सालीने बनवा DIY फेस मास्क, 15 दिवसात उजळेल चेहरा जेल आयलायनर कसा बनवायचा? जेल आयलायनर घरी बनवण्यासाठी सर्वप्रथम 1 रिकामा डबा घ्या. मग तुम्ही त्यात २-४ थेंब आय प्राइमर आणि २-३ थेंब खोबरेल तेल घाला. त्यानंतर या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करून गुळगुळीत करा. नंतर त्यात तुमचा कोणताही आवडता रंग टाका आणि मिक्स करा. अशा प्रकारे जेल आयलायनर तयार होते. जेल आयलायनरचा वापर तुम्ही लायनर आणि काजळ म्हणून देखील करू शकता.