केळ हे असे फळ आहे जे त्याच्या पौष्टिकतेमुळे सुपर फूडच्या श्रेणीत येते. ज्या प्रकारे केळ हे आरोग्यासाठी पौष्टिक आहे तसेच केळ्याच्या सालींमध्ये देखील भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि खनिज क्षार आढळतात. केळ्याचे साल आपण खाण्यासाठी वापरत नसलो तरी त्याचे आपल्या त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. केळ्याच्या सालींमधे असणाऱ्या पोषक घटकांमुळे त्वचेच्या अनेक समस्या बऱ्या होण्यात आणि त्वचा निरोगी राहण्यात मदत होते. तेव्हा आज तुम्हाला केळ्याच्या सालीपासून फेस मास्क कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. हेल्थलाइननुसार, केळीच्या सालीच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या समस्येवर मात करू शकता. याशिवाय त्याची सालं तुमच्या त्वचेवर घासल्यास त्वचा उजळ आणि चमकदार होतो. इतकंच नाही तर डोळ्यांच्या आजूबाजूला सूज असेल तर केळ्याची साल डोळ्यांवर ठेवल्यास सूजही कमी होऊ शकते. तसेच केळ्याची साल त्वचेला लावल्याने त्याने त्वचेला हायड्रेट करण्यासाठी तसेच मुरुमांचे डाग काढून टाकण्यासाठी देखील फायदा होतो.
अशाप्रकारे बनवा फेस मास्क : केळ्याचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही केळ्याच्या साली घेऊन त्यांना लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. मग त्यात एक चमचा मध, एक चमचा दही आणि केळ्यांचे दोन तुकडे टाकून चांगले मिक्स करा, अशा प्रकारे तुमचा फेस मास्क तयार होतो. Hair Fall Home Remedies : केस खूपच गळतायत? मग 8 घरगुती उपाय ठरतील रामबाण अशा प्रकारे करा त्याचा वापर : एका बाउलमध्ये केळ्याचा फेसमास्क काढून घ्या. मग तुमचा चेहरा आणि मान स्वच्छ धुवून त्याच्यावर फेस मास्क लावा. हा फेस मास्क चेहेऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा आणि मग चेहेरा धुवून टाका.