मुंबई : उन्हाळ्यात विविध प्रकारचे पेय प्यावेसे वाटते. अनेकदा उन्हातून घरी आल्यानंतर काहीतरी थंड प्यावं असं सगळ्यांना वाटत असतं, यामुळे तहानही भागते आणि मनाला शांतीही मिळते. यामध्ये लोक कोकम सरबत, उसाचा रस तसेच लस्सी लोक पितात. पण आता कॉफी पिण्याचा देखील ट्रेंड सुरु आहे. अनेक तरुण मंडळींचा कल हा कोल्ड कॉफी पिण्याकडे असतो.
पण कॅफेमधली कॉफी आणि घरची कॉफी यामध्ये फरक असतो, त्यामुळे कॅफेसारखी कॉफी बनवता आली तर किती चांगलं झालं असतं, असं अनेकांचं मत असतं. तर चला मग वेळ न घालवता कॅफेसारखी कोल्ड कॉफी कशी बनवायची जाणून घेऊ.
कोल्ड कॉफीसाठी साहित्य
2 चमचे कॉफी पावडर
2 कप फुल क्रीम दूध
बर्फाचे तुकडे
चॉकलेट सिरप (चॉकलेट सिरप नसल्यास, तुम्ही चॉकलेट वितळवू शकता किंवा पावडर वापरु शकता)
२/३ चमचे बारीकसाखर
वरील प्रमाणात तुमची २ कप कॉफी आरामात बनु शकते.
बनवण्याची कृती
सर्व प्रथम ग्लासेसमध्ये चॉकलेट सिरप टाका आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर कोल्ड कॉफी बनवायला सुरुवात करा.
एका कपमध्ये दोन चमचे कोमट पाणी घ्या. त्यात कॉफी घालून मिक्स करा. हे मिश्रण चांगलं फेटवा. आता दूध, ही फेटवलेली कॉफी आणि साखर, बर्फाचे तुकडे घेऊन मिक्सरमध्ये टाका. फेस येईपर्यंत मिक्सर सुरु ठेवा.
आता फ्रीजमधून ग्लास काढा आणि त्यात कोल्ड कॉफी टाका. हवे असल्यास वर आणखी चॉकलेट सिरप घाला. तुमची कोल्ड कॉफी तयार आहे.
चॉकलेट सिरप कसा बनवायचा?
जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर चॉकलेटचे 2-3 तुकडे घ्या. त्यात थोडे दूध घालून उकळवा. ते वितळल्यावर त्यात १ चमचे पाणी टाका, तुमचे चॉकलेट सिरप तयार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.