मुंबई, 08 नोव्हेंबर : बहुतेक लोक केसांना सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी केसांची काळजी घेण्याचा विशेष प्रयत्न करतात. असे असूनही, काही लोकांचे केस खूप पातळ आणि जाडी फार कमी दिसते. त्यासाठी अनेक महागड्या हेअर प्रोडक्ट्सचा अवलंब करूनही त्यांचे केस दाट आणि बाउन्सी होत नाहीत. यासाठी आपली इच्छा असल्यास काही सोप्या टिप्स फॉलो करून केसांची घनता सहजपणे वाढवू शकता.
वास्तविक, केमिकल प्रोडक्ट्स वापरून केसांना जास्त काळ घनदाट ठेवता येत नाही. काही नैसर्गिक गोष्टींचा वापर केसांची निगा राखण्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. ज्याच्या मदतीने तुम्ही केसांचा घनदाटपणा कायमस्वरूपी वाढवू शकता आणि केसांना नैसर्गिकरित्या दाट आणि बाउंसी बनवू शकता. जाणून घेऊया केसांचा व्हॉल्यूम वाढवण्याचे काही सोपे उपाय.
कोरफड जेल -
पोषक तत्वांनी युक्त कोरफड जेल केसांची घनता वाढवण्यास मदत करते. तसेच हेअर केअरसाठी कोरफड जेलचा वापर पूर्णपणे साइड इफेक्टमुक्त आहे. अशावेळी केसांना एलोवेरा जेल लावा आणि अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचे केस दाट होतील.
खोबरेल तेलाने मसाज -
केसांची घनता वाढवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाने हेअर मसाज देखील करू शकता. यासाठी केसांना कोमट खोबरेल तेल लावा आणि टाळूला हलक्या हातांनी मसाज करा. असं नियमित केल्याने तुमचे केस घनदाट बनतील.
कांद्याचा रस लावा -
कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावल्याने केसांची घनताही झपाट्याने वाढते. कांदा मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या. आता कांद्याचा रस मुळांना आणि केसांना लावा. त्यानंतर 10-15 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या केसांची वाढ जलद होईल आणि केसांमध्ये चमकही दिसून येईल.
आवळा खा -
व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत होतेच पण केसांची वाढही वेगाने होऊ लागते. आवळा आवडत नसल्यास आवळा जाम आणि आवळा कँडी खाऊनही तुम्ही केसांची घनता सहज वाढवू शकता.
केमिकल्स -
केस घनदाट व्हावेत यासाठी काही लोक बाजारात मिळणारी उत्पादने वापरतात. पण त्यामध्ये असलेल्या विविध केमिकल्समुळे केस गळू शकतात. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी केमिकलयुक्त गोष्टींचा वापर टाळणे चांगले.
हे वाचा - सरकार रद्द करणार 10 लाख शिधापत्रिका, ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत धान्य
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Woman hair, Women hairstyles