आल्याचा चहा प्या : धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करताना अनेक वेळा लोकांना चक्कर येणं आणि उलट्या होणं सुरू होतं. अशा परिस्थितीत आराम मिळण्यासाठी लोक पुन्हा धूम्रपानाचा आधार घेतात. पण आल्याचा चहा प्यायल्यानं किंवा आल्याचा रस घेतल्यास धूम्रपानाला स्पर्श न करताही आराम मिळतो.
बडीशेप आणि ओव्याचं सेवन करा : बडीशेप आणि ओव्याच्या पावडरचं सेवन करून तुम्ही धूम्रपान सोडू शकता. ते बनवण्यासाठी बडीशेप आणि ओवा बारीक करून पावडर बनवा. आता या पावडरमध्ये थोडेसं काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला आणि रात्रभर ठेवा. सकाळी हे मिश्रण गरम तव्यावर भाजून हवाबंद डब्यात ठेवा. धूम्रपान करण्याची इच्छा असताना या चुर्णाचं सेवन करा.
आले आणि आवळ्याची पावडर बनवा : धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आलं आणि आवळा किसून घ्या आणि चांगलं वाळवा. आता त्यात लिंबू आणि काळं मीठ मिसळून हवाबंद डब्यात ठेवा. दिवसातून दर काही मिनिटांनी याचं सेवन केल्यानं तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा जाणवणार नाही.
मॉर्निंग वॉक आणि योगासनं करून पहा : मॉर्निंग वॉक आणि थोडा वेळं योगासनं करणं तुम्हाला धूम्रपान सोडण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. आपल्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक आणि योगासनं समाविष्ट केल्यानं निरोगी, उत्साही आणि ताजेतवानं वाटू लागतं. तसंच, याचा शरीराला धूम्रपान सोडण्यासाठी खूप मदत होते.
मध आणि दालचिनीची मदत घ्या : धूम्रपानापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही मध आणि दालचिनीचं मिश्रण देखील तयार करू शकता. यासाठी दालचिनी बारीक करून त्यात मध मिसळा आणि धूम्रपान करायची इच्छा झाल्यास त्याचं सेवन करा. यामुळे तुम्हाला धूम्रपान करावसं वाटणार नाही.(Disclaimer: या लेखातील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी news18 याची हमी देत नाही.)