जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळ्यात ट्यूब लाईटवर भिरभिरतात माशा? हे केलं तर जातील पळून

पावसाळ्यात ट्यूब लाईटवर भिरभिरतात माशा? हे केलं तर जातील पळून

पावसाळ्यात ट्यूब लाईटवर भिरभिरतात माशा? हे केलं तर जातील पळून

पावसाळ्यात ट्यूब लाईटवर भिरभिरतात माशा? हे केलं तर जातील पळून

अनेकदा पावसाळ्यात घरातील प्रकाश दिव्यांवर माशा, किडे भिरभिरतात. तेव्हा पावसाळ्यात तुम्ही अशा काही ट्रिक्स करू शकता जेणेकरून या माशा काही मिनिटातच निघून जातील.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बहुतेक लोकांचा पावसाळा ऋतू हा आवडीचा असतो. पावसाळ्यात हवा शुद्ध होऊन सर्वत्र गारवा पसरतो पण त्यासोबतच पावसात येणाऱ्या कीटकांचा देखील त्रास होतो. अनेकदा पावसाळ्यात घरातील प्रकाश दिव्यांवर माशा, किडे भिरभिरतात. घरात एखादी लाईट सुरु असली तर त्याच्यावर अनेक पाखर बसतात. बरेच उपाय करूनही ते जाण्याचं नाव घेत नाही आणि त्यांना मारणं देखील योग्य वाटतं नाही. तेव्हा पावसाळ्यात तुम्ही अशा काही ट्रिक्स करू शकता जेणेकरून या माशा काही मिनिटातच निघून जातील. झेंडू आणि तुळस : पावसाळ्यात घरात कीटक आणि पाखर येत असतील तर घरातील एका कोपऱ्यात तुम्ही झेंडूच्या फुलांचा गुच्छ किंवा तुळशीची पाने ठेऊ शकता, यामुळे कीटक घरात येण्याचं प्रमाण कमी होईल. घर स्वच्छ ठेवा : पावसाळ्यात घराची साफसफाई करण्यासोबतच, खिडकी-दारे, ट्यूबलाइट, बल्ब यांची साफसफाई करत रहा. यासाठी दोन कप पाण्यात एक कप व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणात कापड बुडवून - पिळून खिडक्या आणि दारांसह बल्ब आणि ट्यूबलाइट स्वच्छ करा. यामुळे माशा घरात येणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

दार खिडक्या बंद करा : संध्याकाळी दिवे लावण्यापूर्वी तुम्ही दार खिडक्या लावून घ्या. घरात शिरण्याचे सर्व मार्ग बंद असल्याने किडक घरत प्रवेश करणार नाहीत. दिवे बंद करा : पावसाळ्यात घरातील ट्यूब लाईटवर दिवे येत असतील तर घरातील दिवे काही काळासाठी बंद करा. दिवे बंद केल्यावर घरात येणारे कीटक आणि पाखर निघून जातील. Cleaning Tips : पावसाळा सुरु झाला की बाथरूममध्ये गांडूळ येतात? मग करा हे सोपे उपाय एअर फ्रेशनर तयार करा : पावसाळ्यात घरी येणाऱ्या कीटकांपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही घरातील काही वस्तूंचा वापर करून एअर फ्रेशनर तयार करून त्याचा वापर करू शकता. एअर फ्रेशनर बनवण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा, निलगिरीचे काही थेंब, यूकेलिप्टस, सिट्रोनेला, एसेंशिअल ऑइल, लिंबाचा रस एकत्र करून मिक्स करा. मग तयार झालेले मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून त्याला दिवसातून काही वेळा स्प्रे करा. यामुळे पाखर आणि कीड घरातील लाईटवर भिरभिरणार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात