Home /News /lifestyle /

Relationship Tips: असुरक्षिततेची भावन संपवेल तुमचं नातं, अशाप्रकारे हाताळा ही परिस्थिती

Relationship Tips: असुरक्षिततेची भावन संपवेल तुमचं नातं, अशाप्रकारे हाताळा ही परिस्थिती

नात्यातील असुरक्षिततेच्या भावनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकणं आणि ते योग्यरीत्या कसं हाताळणं आवश्यक आहे. जाणून घ्या ही परिस्थिती हँडल करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

मुंंबई, 28 फेब्रुवारी: नात्यात (Insecurity in Relationship) असुरक्षिततेची भावना निर्माण होणं ही सामान्य बाब आहे. जेव्हा आपण एखाद्यावर जिवापाड प्रेम करतो, तेव्हा त्याच्या अनुषंगानं असुरक्षित वाटणं हे अपरिहार्य असतं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत या भावनेमुळे नातेसंबंध सुंदर बनतात आणि आपण आपल्या जोडीदाराची अधिक काळजी घेऊ लागतो; पण ही असुरक्षितता वाढू लागली आणि ती तुमच्या नात्यावर आणि प्रेमावर वर्चस्व गाजवू लागली तर ती धोकादायकदेखील ठरू शकते. नात्यातल्या अशा भावनेमुळे दोघांमधला दबाव वाढू लागतो आणि एकमेकांसोबत असताना अस्वस्थता आणि दुरावल्यासारखं वाटू लागतं. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदारावर अनेक बंधनं लादू लागता आणि त्यामुळे तुमचा दोघांचा मूड नेहमी खराब राहतो. एवढंच नाही, तर हळूहळू तुम्ही एकमेकांशी थेट संवाद साधत नाही किंवा काही गोष्टी लपवू लागता. दुसरीकडे, तुम्ही तुमच्या जोडीदाराला काहीही बोलू शकत नाही आणि तुम्हाला आतल्या आत दबल्यासारखं वाटतं. अशा स्थितीत, नात्यातल्या असुरक्षिततेच्या भावनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकणं आणि ते योग्यरीत्या कसं हाताळायचं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे वाचा-लग्नापूर्वी जोडीदाराची ही एक गोष्ट चेक करायला विसरू नका; भविष्यात होतो पश्चाताप अशी हाताळा नात्यातल्या असुरक्षिततेची भावना कारणं शोधा- जेव्हा आपल्याला ठोस कारण (Causes of insecurities in Relationship) कळतं, तेव्हाच आपल्याला कोणत्याही समस्येवरचं उत्तर मिळतं. काही वेळा पास्ट रिलेशनमधला (Past Relation) वाईट अनुभव किंवा तुमच्या अतिसंरक्षाणात्मक वर्तनाचा परिणाम तुमच्या सध्याच्या नातेसंबंधावर वर्चस्व गाजवतो. अशा परिस्थितीत या भावनेतून बाहेर पडणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. भावना शेअर करा- याविषयी तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणानं बोला. स्वतःला किंवा जोडीदाराला त्रास देण्यापेक्षा मुक्त संवादाच्या माध्यमातून समस्या सोडवणं अधिक चांगलं आहे. नात्यात तिसऱ्या व्यक्तीला आणू नका- तुमच्या नात्यात असुरक्षिततेची किंवा मत्सराची भावना असेल, तरी तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला आणण्याची चूक करू नका. असं केल्याने तुमचं नातं आणखी कमकुवत होऊ शकते. तुम्ही स्वतः जोडीदाराशी बोलून समजावून सांगितलं तर ते अधिक चांगलं ठरेल. हे वाचा-Love Addiction मध्ये अडकले आहात का? नैराश्याकडे नेऊ शकतं हे प्रेमाचं व्यसन जोडीदाराला वैयक्तिक वेळ द्या- तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस (Personal Space) द्या, जेणेकरून त्याला तुमची उणीव तर जाणवेलच पण तुमची किंमतही कळेल. असं केल्याने नात्यातली असुरक्षिततेची आणि मत्सराची भावना कमी होईल. कुटुंबीयांची मदत घ्या- तुम्हाला तुमच्या नात्यात काही अडचण जाणवत असेल तर कुटुंबीयांची मदत घ्या. त्यांना तुमची परिस्थिती सांगा आणि त्यांच्याकडे मदत मागा. स्वतःची समजूत काढा- कधी कधी आपल्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या गोष्टींवर आपला विश्वास बसतो. अशा स्थितीत थोडा संयम ठेवण्याची गरज आहे आणि परिस्थिती समजून घेणंही आवश्यक आहे. घाईमुळे तुमचं नातं खराब होऊ शकते. अतिविचार टाळा.
First published:

Tags: Relation, Relationship, Relationship tips, Relationships, Save relationship

पुढील बातम्या