लहान बाळांची त्वचेची खूप काळजी (Baby Care) घेणं आवश्यक आहे. कारण, त्यांची त्वचा खूप संवेदनशील असते. बऱ्याचदा लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भात वयस्क स्त्रिया अनेक गोष्टी करण्याचा सल्ला देत असतात. त्यामध्ये बाळांचे कान स्वच्छ करण्यासाठी तेल घालावे, असा सल्ला असतो. पण, खरंच असं करणं बरोबर आहे का? चला तर लहान मुलांचे डोळे, कान आणि नाक स्वच्छ कसे करावेत (How to clean baby’s eyes, ears and nose), याच्या काही टिप्स जाणून घेऊयाच…
कान कसं स्वच्छ करावं?
बऱ्याचदा कानामध्ये जो इअरवॅक्स जमा झालेला आपल्याला चांगला दिसत नाही. पण, तोच वॅक्स इन्फेक्शनपासून बाळाला वाचवू शकतो. तज्ज्ञांच्या मतानुसार लहान मुलांच्या कानात गडद तपकिरी रंगाचा मेण असू शकतो. त्याला स्वच्छ करण्याच्या उद्देशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. कारण, मुलांच्या कानांसाठी ते चुकीचं आहे. तरीही तुम्ही तुमच्या बाळाचे कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ओलं वाॅशक्लाॅथ आणि गरम पाण्याचा वापर करा. कानातील कोणत्याही प्रकारचा वॅक्स काढायचा असेल, तर त्यात काडीसारखी कोणतीही वस्तू घालू नका. कानाच्या बाजुंनी घासा, म्हणजे ती घाण बाहेर येते. कोणाच्याही सल्ल्याने कानात तेल घालू नका. तसेच वाॅशक्लाॅथदेखील घालू नये. कापसाची ईयरबड्सदेखील वापरू नका. वाचा : तुम्हाला इडली खाण्याचे हे 10 फायदे माहित आहेत का? पाहा काय सांगतात फिटनेस एक्सपर्ट
नाक कसं स्वच्छ करावं?
लहान बाळांचे स्वच्छ करण्यासाठी त्यांच्या नाकात कधीही, काहीही घालू नये. त्यांचे स्वच्छ करण्यासाठी त्यांच्या नाकपुडीत बोट घालून ते स्वच्छ करण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार नोज ड्राॅपचा वापर करा. या ड्राॅपचा वापर केल्यामुळे नाकातील घाण साॅफ्ट होईल, त्यानंतर कापूस घेऊन ती घाण काढू शकता किंवा साॅफ्ट कापड ओलं करून बाळाचं नाक स्वच्छ करू शकता. वाचा : Baby Care: दूध प्यायला तुमच्या बाळाला आवडत नाही का? हे दोन मिल्कशेक देऊन पाहा, आवडीनं पेईल
डोळे कसे स्वच्छ करावेत?
अनेकदा लहान मुलांच्या डोळ्यांत पिवळ्या रंगाची घाण जमा होत असते. अशावेळी लहान मुलांच्या डोळ्यांचा चोळू नका. डोळ्यांतील घाण काढायची असेल, तर गरम पाण्यातील कापूस भिजवून डोळे स्वच्छ करा. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या डोळ्यांतून सतत पाणी येत असेल किंवा डोळे लाल झालेले दिसत असतील तर त्वरीत डाॅक्टरांची भेट घ्या.