पावसाळा सुरु झाला कि रेनकोट आणि छत्री खरेदी करण्यासाठी लोक दुकानांमध्ये गर्दी करतात. पावसाळ्यात रेनकोटमुळे संपूर्ण शरीराचे भिजण्यापासून संरक्षण होते. त्यामुळे महिला आणि पुरुष पावसाळ्यात सर्वाधिक वेळा या रेनकोटचा वापर करतात. त्यामुळे रेनकोट खरेदी करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. वॉटरप्रूफ मटेरियल : रेनकोट खरेदी करताना नायलॉन किंवा पॉलिस्टर, गोर-टेक्स यांसारख्या वॉटरप्रूफ मटेरियलपासून बनवलेलया रेनकोटचीच निवड करा. यामुळे तुमचे पावसात भिजण्यापासून संरक्षण होऊ शकेल आणि असे रेनकोट तुम्हाला कोरडे ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाच्या भूमिका पारपाडेल. हवेशीर असणे : प्लास्टिक, नायलॉन मटेरियल पासून बनवलेला रेनकोट असल्याने तो घातल्यानंतर शरीराला घाम येऊ शकतो. अशा स्थितीत जर रेनकोट शरीराला अतिशय फिट्ट असला तर श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. तेव्हा जाळीचे अस्तर किंवा वेंट्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेला रेनकोट पहा. त्यामुळे पाऊस असतानाही ओलावा आणि उष्णता बाहेर पडू शकते. Monsoon Tourism : मुंबईकरांनो, पावसाचा मनमुराद आनंद लुटायचाय? मग या 7 ठिकाणांना नक्की भेट द्या सीलबंद शिवणकाम : रेनकोटचे सील किंवा टेप केलेले शिवण आहे का? ते तपासा. सीलबंद शिवण स्टिचिंगमधून पाणी जाण्यापासून रोखतात. त्यामुळे, रेनकोटची एकूण वॉटरप्रूफिंग क्षमता वाढते. हुड डिझाईन : हुड डिझाइन आणि रेनकोटची कार्यक्षमता विचारात घ्या. ऍडजस्टेबल किंवा वेगळे करता येण्याजोग्या हुडसह रेनकोट शोधा. हा रेनकोट तुमच्या डोक्याला आणि चेहऱ्याला चांगला कव्हरेज आणि संरक्षण देतो.
रेनकोटची लांबी : तुम्हाला आवश्यक असणाऱ्या लांबीचा रेनकोट निवडा. लांब रेनकोट पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी अधिक कव्हरेज देतात. तर लहान रेनकोट अधिक मोबिलीटी देतात. रेनकोटची लांबी ठरवताना ते घालून तुम्ही नेमके कोणते काम करणार आहात हे लक्षात घ्या. पॉकेट्स आणि स्टोरेज : रेनकोट खरेदी करताना त्याच्या आत आणि बाहेर किती पॅकेट्स आहेत ते पहा. खिशात चाव्या, पाकीट किंवा फोन यांसारख्या लहान वस्तू पावसापासून संरक्षित ठेवण्यासाठी रेनकोटमधील पॉकेट्स महत्वाचे असतात. Cleaning Tips : पावसाळा सुरु झाला की बाथरूममध्ये गांडूळ येतात? मग करा हे सोपे उपाय टिकाऊपणा : रेनकोट खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासून घ्या. स्टिचिंग, रेनकोटची चैन, बटण, कापड इत्यादी पासून तुम्ही चांगले रेनकोट निवडू शकता. जेणेकरून तो बरीच वर्ष टिकू शकेल. स्टाईल आणि व्हरायटी : सध्या अनेक फॅशनेबल रेनकोट बाजारात उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्ही तुमच्या स्टाईलनुसार रेनकोटची निवड करू शकता.