मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ऑफिसमध्ये डुलक्या म्हणजे नोकरीवर संक्रात; झोप घालवण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा

ऑफिसमध्ये डुलक्या म्हणजे नोकरीवर संक्रात; झोप घालवण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा

Tips To Avoid Sleep During Office Work: काम करताना झोप येण्याची अनेक कारणं असू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी, अनेक उपाय देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून कामाच्या दरम्यान झोप येणार नाही. या विषयी जाणून घ्या.

Tips To Avoid Sleep During Office Work: काम करताना झोप येण्याची अनेक कारणं असू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी, अनेक उपाय देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून कामाच्या दरम्यान झोप येणार नाही. या विषयी जाणून घ्या.

Tips To Avoid Sleep During Office Work: काम करताना झोप येण्याची अनेक कारणं असू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी, अनेक उपाय देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून कामाच्या दरम्यान झोप येणार नाही. या विषयी जाणून घ्या.

मुंबई, 14 जानेवारी : झोपेचा (SLEEP) आपल्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. झोपेतून उठून ताजंतवानं होण्यासाठी त्यापूर्वी चांगली झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळं जागेपणी आपण उत्साही राहतो. शिवाय, आपली दैनंदिन कामंही सहज होतात आणि मानसिक संतुलनही राहतं. जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांपासून ते आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रापर्यंत झोपेचं महत्त्व सर्वांनीच सांगितलंय. परंतु, काही कारणास्तव आपल्याला नीट झोप येत नसेल, तर त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन कामकाजावर (Tips To Avoid Sleep During Office Work:) होतो. मग ती घरातील कामे असोत, बाहेरची किंवा ऑफिसमधली.

काम करताना झोप येण्याची अनेक कारणं असू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी, अनेक उपाय देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून कामाच्या दरम्यान झोप येणार नाही. इथं आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळं कामाच्या दरम्यान झोप न लागण्याच्या समस्येपासून आराम मिळेल. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

कामादरम्यान अधेमधे उठून चालणं

ऑफिसच्या कामात किंवा दैनंदिन कामांमध्ये तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल, तर उठून थोडं चालणं हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहे. लोक कामाच्या दरम्यान झोप येऊ नये, यासाठी अनेकदा निकोटीन किंवा कॅफिन असलेल्या पदार्थांचं सेवन करतात. चहा-कॉफी किंवा सिगारेटप्रमाणेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवनही करण्याऐवजी त्या काळात उठून थोडं चालण्याची सवय लावली तर, त्याचा डुलकी येण्याच्या समस्येतून सुटका होण्यासोबतच आपल्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. कारण चालण्यामुळं आपल्या मेंदूमध्ये आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, ज्यामुळं आपण पुन्हा ताजेतवाने होतो. 10-15 मिनिटं चालल्यानं दोन-तीन तास ऊर्जा मिळते, असं तज्ज्ञांचं मत आहे.

डोळ्यांची काळजी घ्या

आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्हीची सवय झाली आहे, परंतु, आपण हे जाणून घेतलं पाहिजे की, त्यांच्या स्क्रीनमधून बाहेर पडणारा प्रकाश आपल्या झोपेवर तर परिणाम करतोच; शिवाय, आपले डोळेही थकतात. यामुळं आपल्या डोळ्यांवर ताण येतो आणि आपल्याला झोप येते. त्यामुळं डुलकी येत असल्यासारखं वाटताच आपण स्क्रीनपासून काही काळ दूर जावं. तसंच, रात्री उशिरापर्यंत या गॅजेट्सचा वापर टाळावा. जेणेकरून आपल्याला शांत झोप लागेल आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ताजेतवाने वाटू शकेल.

हे वाचा - Omicron diet: कोरोनाची लक्षणं दिसताच खायला सुरू करा या गोष्टी; हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ टळेल

लख्ख प्रकाशात या

कामाच्या दरम्यान झोप न लागण्याचं एक कारण म्हणजे, आपल्या आजूबाजूच्या परिसरात कमी प्रकाश असणं हेदेखील असू शकतं. आजकाल घरून काम करण्याची (work from home) पद्धत वाढली आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून शांत वातावरणात काम करणं पसंत करतात. त्यांनी मध्येच घराबाहेर पडून सूर्यप्रकाशात यावं. याशिवाय आपल्यापैकी अनेकांना कमी प्रकाशात काम करायला आवडतं. पण काम करताना झोप लागण्याचं हेही एक कारण असू शकतं. म्हणून, जर तुम्हाला अशी कोणतीही समस्या येत असेल तर, कामाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश ठेवा.

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

दीर्घ श्वास घ्या

चालताना दीर्घ श्वास घेतल्यानं तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. अशा प्रकारे, दीर्घ श्वास घेतल्यानं तुमच्या हृदयाला आणि मनाला खूप आराम मिळतो. यामुळं तुमच्यात एक नवीन ताजेपणा येतो. खरं तर, ऑक्सिजन आपल्या ऊर्जा पातळीचा नियामक आहे. तेव्हा काम करताना झोप येणं टाळण्यासाठी दीर्घ श्वास घेणं हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे.

First published:

Tags: Sleep, Worker