जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Driving License: घरबसल्या लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी करू शकता अर्ज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Driving License: घरबसल्या लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी करू शकता अर्ज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Driving License: घरबसल्या करू शकता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Driving License: घरबसल्या करू शकता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Learning Driving License: पक्के ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यापूर्वी लर्निंग लायसन्स काढावं लागतं. लर्निंग लायसन्स काढण्यासाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 ऑगस्ट: सर्व वाहन चालकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) घेणं अनिवार्य आहे. जर तुम्ही वाहन परवान्याशिवाय दुचाकीपासून ते चारचाकी किंवा कोणतंही चालवत असाल तर तुमचं चलन कापलं जाऊ शकतं. तसेच वाहन विम्यासारख्या सुविधांपासून वंचित राहू शकतात. या कारणासाठी लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स बनवणं महत्त्वाचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी विशिष्ट प्रोसेस आहे. पक्कं ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याआधी वाहनधारकांचे लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स **(Learning Driving License)**बनवले जाते. त्यानंतर कायमस्वरूपी डायव्हिंग परवाना दिला जातो. लर्निंग लायसन्सचे खूप फायदे आहेत.  लर्निंग लायसन्समुळे लोकांना वाहन चालवायला शिकता येतं. नियम व अटींची पूर्तता करून तुम्ही लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्सच्या माध्यमातून गाडी चालवायला शिकू शकता. कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी हे पहिले पाऊल मानले जाते. लर्निंग लायसन्स नसल्याबद्दल वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे दंड आकारले जातात. लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करणंही शक्य आहे. याशिवाय कुठूनही टेस्ट देऊन काही तासांत परवाना मिळवता येतो. तथापि, कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी, एखाद्याला परिवहन कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. जाणून घेऊया लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स कसा बनवता येईल. लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?-

  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या वेबसाइटला भेट द्या.
  • ड्रॉप डाउन सूचीमधून तुमचं राज्य निवडा.
  • आता सूचीमधून लर्नर्स लायसन्ससाठी अर्ज करण्याचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर आपल्या घरून किंवा इतर ठिकाणांहून टेस्ट देण्यासाठी आधार कार्डसह अर्जदार हा पर्याय निवडा. आता सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आधार प्रमाणीकरण पर्याय निवडून नंतर सबमिट करण्यासाठी बॉक्सवर टिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

हेही वाचा-  Movie theaters in Pune: ‘ही’ आहेत पुणे स्टेशनजवळील बेस्ट सिनेमागृहे, बिनधास्त लुटा चित्रपटांचा आनंद

  • यानंतर, आधार कार्ड तपशील आणि मोबाइल नंबर सबमिट केल्यानंतर, Generate OTP वर क्लिक करा.
  • OTP टाकल्यानंतर, सर्व तपशील वेरिफाय करा. नंतर अटी आणि शर्ती स्वीकारण्यासाठी बॉक्स चेक करा. पुढे, प्रमाणीकरण बटणावर क्लिक करा.
  • आता परवाना शुल्क भरण्याची पद्धत निवडा.
  • चाचणीसाठी पुढे जाण्यासाठी 10 मिनिटांचा ड्रायव्हिंग सूचना व्हिडिओ पाहणे अनिवार्य आहे.
  • ट्यूटोरियल व्हिडिओ संपल्यानंतर, नोंदणीकृत फोन नंबरवर चाचणीसाठी एक OTP आणि पासवर्ड पाठवला जाईल.
  • चाचणी सुरू करण्यासाठी, फॉर्म पूर्ण करा आणि पुढे जा. तुमच्या डिव्‍हाइसवर फ्रंट कॅमेरा फिक्स करा आणि तो चालू करा.
  • आता चाचणीसाठी उपस्थित राहा आणि चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी 10 पैकी किमान सहा प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.
  • चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, नोंदणीकृत फोन नंबरवर परवाना लिंक पाठविला जाईल. जर चाचणी उत्तीर्ण झाली नाही तर पुन्हा चाचणीसाठी 50 रुपये आकारले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात