मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Post Office बचत खात्यासाठी Internet Banking; आता घरबसल्याच ट्रान्सफर करा पैसे

Post Office बचत खात्यासाठी Internet Banking; आता घरबसल्याच ट्रान्सफर करा पैसे

तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करायची असेल तर, काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे.

तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करायची असेल तर, काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे.

तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करायची असेल तर, काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे.

    मुंबई, 14 डिसेंबर : सध्या पोस्ट खात्यानंही (post office) कात टाकली असून काळानुरूप सर्व अत्याधुनिक सेवा देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय पोस्ट खात्यानं स्वतःची बँकिंगही सेवा सुरू केली असून इतर बँकाप्रमाणे ही बँकदेखील आपल्या ग्राहकांना सर्व आधुनिक सेवा सुविधा प्रदान करते. त्यामध्ये आता इंटरनेट बँकिगचाही समावेश आहे. सरकारी बँकांपेक्षा पोस्टातील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVF), पीपीएफ (PPF) आदी बचत योजनांवर अधिक व्याज मिळत असल्यानं आणि सुरक्षितता अधिक असल्यानं मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या ठेवी पोस्टात ठेवतात. पोस्टातील ठेवी किंवा रक्कम पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेतील (POSB) खात्यात ट्रान्स्फर करायची असेल तर आता इंटरनेट बँकिंगची सेवा उपलब्ध आहे. तुमच्या बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करायची असेल तर, काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे तुमचं पोस्ट बँकेतील खाते सुरू असले पाहिजे. तुमचा चालू मोबाईल क्रमांक आणि इमेल आयडीही आवश्यक आहे. पॅनकार्ड (Pan card Number) क्रमांकही हवा. केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रंही जवळ असल्याची खात्री करून घ्या. हे वाचा - 1 जानेवारीपासून बदलणार Cheque पेमेंट करण्याचा नियम आता इंडियन पोस्टच्या (Indian Post) वेबसाईटवरून पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगचा फॉर्म डाऊनलोड करून घ्या. त्यासाठी या लिंकचा वापर करा. https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Form.aspx. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून तो फॉर्म घेऊन तुमचं खातं असलेल्या पोस्टाच्या शाखेत जा. तिथं तो अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं जमा करा. तुम्हाला तुमच्या खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सेवा कार्यान्वित केल्याचा एक एसएमएस येईल. तो आल्यानंतर  https://ebanking.indiapost.gov.in या लिंकवर जाऊन ‘न्यू युजर अॅक्टिव्हेशन’ या पर्यायावर क्लिक करा. इथं तुम्हाला कस्टमर आयडी जो तुमच्या पासबुकच्या पहिल्या पानावर छापलेला असतो. तो टाका. अकाउंट आयडी हा तुमच्या बचत खात्याचा क्रमांक असतो. काळजीपूर्वक पासवर्ड भरणं आवश्यक आहे. पाचवेळा चुकीचा पासवर्ड भरल्यास युजर आयडी चालत नाही. तो पुन्हा सुरू करण्यासाठी dopeBanking@indiapost.gov.in या वेबसाईटवर रजिस्टर्ड ई-मेल आयडीवरून कस्टमर आयडी, युजर आयडी अशी सर्व माहिती पाठवून अर्ज करावा लागतो. त्यामुळे काळजीपूर्वक पासवर्ड भरणं महत्त्वाचे आहे. हे वाचा - कोरोनामुळे कर्जाचे हप्ते फेडण्यास समस्या? RBI अशी करेल मदत या सर्व पायऱ्या व्यवस्थित पूर्ण केल्यास तुमच्या खात्याचे इंटरनेट बँकिंग (Internet Banking)सुरू होते. मग पीपीएफ (PPF), रिकरिंग डीपॉझिट अर्थात आरडी (RD) इत्यादीसाठी पोस्टात जायची गरज नाही. घरबसल्या तुम्ही पैसे खात्यात भरू शकता. त्यामुळं तुमचा वेळ आणि शक्ती वाचेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Post office, Post office bank

    पुढील बातम्या