जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना किती डिटर्जंट पावडर वापरावी? योग्य प्रमाण बघा, अन्यथा खराब होतील कपडे

वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना किती डिटर्जंट पावडर वापरावी? योग्य प्रमाण बघा, अन्यथा खराब होतील कपडे

वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना किती डिटर्जंट पावडर वापरावी? योग्य प्रमाण बघा, अन्यथा खराब होतील कपडे

कपडे धुताना तुम्ही योग्य प्रमाणात डिटर्जंट पावडरचा वापर केला नाही तर तुमचे कपडे पूर्णपणे खराब होऊ शकतात

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 03 एप्रिल : दररोज सकाळी आंघोळ केली की, वापरून झालेले कपडे धुवावे लागतात. पूर्वी स्त्रिया घरातील सर्व व्यक्तींचे कपडे घेऊन ते धुण्यासाठी नदी किंवा एखाद्या पाणवठ्यावर जायच्या. कालांतरानं घरोघरी नळाचं पाणी पोहचल्यानं स्त्रिया घरीच कपडे धुवू लागल्या. आता तर शहरांसोबतच गावांतील घरांमध्येही कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनचा वापर केला जात आहे. वॉशिंग मशिन कसं वापरायचं हे सर्वांनाच माहीत आहे. स्त्री किंवा पुरुष कोणीही या मशिनच्या सहाय्यानं कपडे धुवू शकतात. पण, कपडे धुण्यासाठी या मशिनमध्ये किती डिटर्जंट पावडर टाकावी लागते, हे कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल. कपडे फार मळलेले नसतील तर कमी पावडर वापरावी आणि कपडे जास्त मळले असतील तर जास्त पावडर वापरावी, असं अनेकांचं गणित असतं. मात्र, हे अजिबात योग्य नाही. कपडे धुताना तुम्ही योग्य प्रमाणात डिटर्जंट पावडरचा वापर केला नाही तर तुमचे कपडे पूर्णपणे खराब होऊ शकतात. ‘एबीपी’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. उन्हाळ्यात फ्रीजमधलं तापमान किती ठेवावं? वॉशिंग मशिनमध्ये किती डिटर्जंट पावडर टाकावी? वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना किती पावडर टाकायची याची माहिती तुम्हाला कोणत्याही डिटर्जंट पावडरच्या पॅकेटवर लिहिलेली दिसेल. यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं की, जर तुम्ही रोज वापरलेले कपडे धूत असाल तर वॉशिंग मशिनमध्ये 150 ग्रॅम डिटर्जंट पावडर टाकावी. जर तुमच्या कपड्यांवर डाग पडले असतील किंवा ते खूप घाणेरडे असतील, तर ते धुण्यासाठी तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये किमान 225 ग्रॅम डिटर्जंट पावडर टाकावी. वॉशिंग मशिन मोठं असल्यास काय करावं? वर नमूद केलेलं डिटर्जंट पावडरचं प्रमाण घरगुती वापराच्या मशिनसाठी योग्य आहे. पण, तुमचं कुटुंब मोठं असेल किंवा तुम्ही लाँड्रीचा व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला कपडे धुण्यासाठी मोठं मशिन वापरावं लागतं. मोठ्या मशिनसाठी किती डिटर्जंट पावडर वापरावी हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. डिटर्जंट पावडरचं प्रमाण कपड्यांच्या वजनावर अवलंबून असतं. घरात वापरल्या जाणार्‍या वॉशिंग मशिनमध्ये एकावेळी सात ते नऊ किलो कपडे धुता येतात तर, मोठ्या वॉशिंग मशिनमध्ये यापेक्षा जास्त कपडे धुता येतात. त्यामुळे तुम्हाला कपड्यांच्या वजनानुसार डिटर्जंट पावडरचं प्रमाण वाढवावं लागेल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    जास्त पावडर वापरल्यानं काय होतं? कपडे धुताना तुम्ही मशिनमध्ये जास्त प्रमाणात डिटर्जंट पावडर टाकल्यास तुमचे कपडे खराब होऊ शकतात त्यांचा रंग फिका पडू शकतो, कपडे धुतल्यानंतरही त्यावर पांढरे डाग दिसू शकतात. या शिवाय, कपडे धुताना जास्त डिटर्जंट पावडर वापरल्यामुळे तुमचे कपडे जास्त काळ टिकत नाहीत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: tips
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात