दिवसातून तुम्ही किती वेळा खाता, पाहा तुमच्या खाण्याच्या वेळा योग्य आहेत का?

दिवसातून तुम्ही किती वेळा खाता, पाहा तुमच्या खाण्याच्या वेळा योग्य आहेत का?

सामान्यपणे दिवसातून 2 ते 3 वेळा खाणं गरजेचं असतं असं म्हटलं जातं, मात्र तज्ज्ञांच्या मते, दिवसातून थोड्या थोड्या प्रमाणात 6 ते 7 वेळा खायला हवं.

  • Share this:

मुंबई, 3 फेब्रुवारी : सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, पुन्हा संध्याकाळी नाश्ता आणि रात्रीचं जेवणं अशी आपली सामान्य खाण्याची वेळ असते. काही जणांच्या खाण्याच्या वेळा ठरलेल्याच असतात, त्यामध्ये ते दुसरं काहीच खातपित नाहीत. तर काही जण जेवण आणि नाश्त्याशिवाय मधल्या वेळेतही काही ना काही चटरपटर खातात. मात्र यामुळे आपल्या शरीराला योग्य पोषण होतं आहे का हा प्रश्न आहेच. शरीराच्या पोषणासाठी दिवसभरात किती वेळा खाणं योग्य आहे.

याबाबत तज्त सांगतात, दिवसाला थोड्या थोड्या प्रमाणात 6 ते 7 वेळा खायला हवं. स्नॅकिंग डायटिशनच्या मते, आपल्या शरीराला प्रत्येकी 2 ते 3 तासांनी काही खाद्य गरजेचं असतं.अशावेळी थोड्या थोड्या प्रमाणात खाणं हा चांगला पर्याय आहे. दिवसाला भरपूर वेळा खाल्ल्याने बॉडी क्लॉक योग्य राहतो. सोबतच पचनक्रियाही सुरळीत राहते.

हेदेखील वाचा - तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता तर नाही ना? काय आहेत लक्षणं पाहा

दिवसाला 6 ते 7 वेळा  खाल्ल्याने काय होईल?

फॅट बर्न होण्याची क्षमता वाढते

शरीराचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं

डाएटवर असणाऱ्या व्यक्तींनी थोड्या थोड्या प्रमाणात खावं असं सांगितलं जातं.

तज्ज्ञांच्या मते, दर 2-3 तासांनी खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा राहते.

दिवसाला भरपूर वेळा खाल्ल्याने शरीराला पोषण मिळेलच असं नाही त्यामुळे तुम्ही काय खाता हेदेखील महत्त्वाचं आहे. 24 तासांत काय आणि किती खावं हे माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतील आणि तुम्ही आजारी पडणार नाही.

हेदेखील वाचा -'हे' ड्रिंक्स कमी करतील तुमचं वाढलेलं  Blood Pressure

 एका दिवसात काय आणि किती खावं

प्रोटिन – शरीराला पोषण मिळण्यासाठी शरीरात प्रोटिन आवश्यक प्रमाणात असणं गरजेचं आहे. त्यामुळे आहारात अंडी, दूध यासारख्या पदार्थांचा समावेश करा.

व्हिटॅमिन्स – आजारापासून दूर राहायचं असेल तर आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि बिटा-केरोटिनही शरीरालाल मिळालायला हवं.

प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगवेगळं असतं, त्यामुळे त्याप्रमाणेच आहार घ्या. याबाबत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात पदार्थांचा समावेश करा.

सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहेत. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. त्यामुळे अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा

First published: February 3, 2020, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading