जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / एक कप कोथिंबीरचा चहा आणि..., उष्माघातामुळे होणाऱ्या लूज मोशन पासून मिळेल आराम

एक कप कोथिंबीरचा चहा आणि..., उष्माघातामुळे होणाऱ्या लूज मोशन पासून मिळेल आराम

एक कप कोथिंबीरचा चहा आणि..., उष्माघातामुळे होणाऱ्या लूज मोशन पासून मिळेल आराम

एक कप कोथिंबीरचा चहा आणि..., उष्माघातामुळे होणाऱ्या लूज मोशन पासून मिळेल आराम

अनेकदा कडक उन्हात बराच वेळ राहिल्याने उष्माघाता येऊन लूज मोशनची समस्या होते. उन्हाळ्यात अनेकदा मसालेदार अन्न किंवा शिळे अन्न खाल्ल्याने अतिसार होतो. डिहायड्रेशनमुळे पचनसंस्थेत पाण्याची कमतरता ही जाणवते. तेव्हा तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने डायरिया, लूज मोशनपासून तुम्हाला आराम मिळू शकेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोकांना पोटाच्या संबंधित समस्या निर्माण होतात. अनेकदा कडक उन्हात बराच वेळ राहिल्याने उष्माघाता येऊन लूज मोशनची समस्या होते. उन्हाळ्यात अनेकदा मसालेदार अन्न किंवा शिळे अन्न खाल्ल्याने अतिसार होतो. डिहायड्रेशनमुळे पचनसंस्थेत पाण्याची कमतरता ही जाणवते. त्यामुळे आतड्यांमध्ये सूज येणे, पोटदुखी, उलट्या, डोकेदुखी, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास समस्या गंभीर होऊन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यावाचून पर्याय नसतो. तेव्हा तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने डायरियापासून तुम्हाला आराम मिळू शकेल. दही : लूज मोशनची समस्या असल्यास युमही दहीचे सेवन करू शकता. दह्यात  प्रोबायोटिक्स  असते जे आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरिया वाढवते आणि शरीरात असलेल्या  टॉक्सिंसला बाहेर काढण्यात मदत करते. यामुळे पोटाला थंडावा देखील मिळतो, तेव्हा जर तुम्हाला लूज मोशनची समस्या होत असेल तर तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. लिंबू पाणी :  लूज मोशनच्या समस्येमध्ये तुम्ही लिंबू पाणी पिणे देखील लाभदायक ठरते. लिंबूमध्ये ऍसिडिक गुणधर्म तसेच अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात ज्यामुळे डायरिया होण्यास कारणीभूत बॅक्टेरिया नष्ट होतो. तेव्हा एका ग्लासमध्ये लिंबू पिळून घ्या आणि त्यात काळे मीठ टाकून त्याचे सेवन करा. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करून तुम्हाला ऊर्जा मिळते.

News18लोकमत
News18लोकमत

केळी :  डायरियाच्या समस्येमध्ये केळी खाणे देखील खूप फायदेशीर ठरते. त्यात फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते जे पचनासाठी योग्य मानले जाते. याशिवाय त्यात पेक्टिन नावाचे तत्व असते, जे अतिसारापासून बचाव करते. कोथिंबिरीचा चहा : डायरिया आणि पोटदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोथिंबीरीचा चहा पिऊ शकता. हा चहा टॉनिकप्रमाणे काम करतो आणि शरीरातील विषारी पदार्थही काढून टाकतो. चहा बनवण्यासाठी अर्धा चमचा कोथिंबीर घेऊन ते एक ग्लास पाण्यात मिसळा, थोडावेळ उकळा आणि गाळून प्या. कोथिंबिरीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के प्रमाणे अनेक गुण आढळतात जे तुमच्या पोटासाठी फायदेशीर ठरू शकतात. Eating Habits : फळांवर चाट मसाला किंवा मीठ लावून खाणे आरोग्यासाठी धोकादायक! पोटात गेल्यावर बनते विष… जिऱ्याच पाणी : लूज मोशन होत असल्यास तुम्ही जिऱ्याचे पाणीही पिऊ शकता. हे पचनाशी संबंधित समस्यांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. त्यात अँटिऑक्सिडेंट, दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे आतड्यांतील हानिकारक जीवाणू काढून टाकतात. एक चमचा जिरे भाजून नंतर बारीक करा. मग ही जिरेपूड आणि काळे मीठ कोमट पाण्यात मिसळून प्या. यामुळे लूज मोशन थांबण्यात मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात