जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फिश टँग ठेवल्यानं घरात सुख-समृद्धी कशी वाढते? जाणून घ्या वास्तुतज्ज्ञ काय म्हणतात...

फिश टँग ठेवल्यानं घरात सुख-समृद्धी कशी वाढते? जाणून घ्या वास्तुतज्ज्ञ काय म्हणतात...

फिश टँग ठेवल्यानं घरात सुख-समृद्धी कशी वाढते? जाणून घ्या वास्तुतज्ज्ञ काय म्हणतात...

काही ठिकाणी घराच्या सजावटीत अ‍ॅक्वेरिअम म्हणजेच छोटेखानी मत्स्यालय ठेवलेलं असतं. या फिश टँकचा याचा वास्तूमधल्या गुणदोषांशी (Vastu And Aquariums) काही संबंध असतो का ?

    नवी दिल्ली, 12 जून : घर ही वास्तू भावनिक, आर्थिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची असते. त्यातले बारीकसारीक बदलही घरातल्या व्यक्तींसाठी फायद्याचे किंवा नुकसानकारक ठरू शकतात. म्हणूनच घराची सजावट करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. काही ठिकाणी घराच्या सजावटीत अ‍ॅक्वेरिअम म्हणजेच छोटेखानी मत्स्यालय ठेवलेलं असतं. या फिश टँकचा याचा वास्तूमधल्या गुणदोषांशी (Vastu And Aquariums) काही संबंध असतो का, याबाबत वास्तू आचार्य मनोज श्रीवास्तव यांनी विश्लेषण केलं आहे. इंडिया डॉट कॉमने त्यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अनेक जण घराच्या सजावटीचा भाग म्हणून मत्स्यालय (Aquariums) घराच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवतात. हॉटेलच्या लॉबीमध्ये, अनेक कार्यालयांच्या रिसेप्शनमध्ये, भोजनालयांमध्ये अ‍ॅक्वेरिअम्स असतात. वास्तू आचार्य मनोज श्रीवास्तव यांच्या मते मत्स्यालयामुळे वास्तूमध्ये काही बदल होतात; पण वास्तुदोषांवरचे उपाय म्हणून याचे कोणतेही उल्लेख धर्मग्रंथात आढळत नाहीत. कारण त्या काळात मत्स्यालय ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती; मात्र तरीही काही वेळा वास्तुदोषांवर उपाय म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. वास्तुदोषांवर उपाय (Vastu Remedies) म्हणून याचा कसा वापर केला जाऊ शकतो, ते पाहण्यासाठी मत्स्यालय कशा पद्धतीनं तयार केलेली असतात, हे समजून घेतलं पाहिजे. मत्स्यालयात पाच घटक एकमेकांशी जोडलेले असतात. त्यातला एअर पंप माशांना ऑक्सिजन पुरवतो व पाणी ढवळण्याचं काम करतो. मासे त्यांचं मांस व त्वचेमुळे अग्नितत्त्वाचे बनलेले असतात. मत्स्यालयातले पेबल्स अर्थात रंगीत दगड पृथ्वी तत्त्वाचे असतात. मत्स्यालयात पाणी काठोकाठ भरलेले नसते. ती पोकळी वायू तत्त्वाचं काम करते. अशा प्रकारे मत्स्यालयामध्ये पाचही तत्त्वांचा समावेश असतो. त्यातही अग्नी, वायू व जल ही तत्त्वं खूप महत्त्वाची असतात. हवेमुळे मत्स्यालयातलं पाणी सतत ढवळलं जात असतं. यामुळे घरात समृद्धी (Prosperity) येते; मात्र यासाठी योग्य प्रकारचे व नेमक्या प्रमाणातले मासे मत्स्यालयात हवेत. फेंगशुईच्या तत्त्वांनुसार पाहिलं, तर असं लक्षात येतं, की सोनेरी आणि काळ्या रंगांचे मासे एकत्रित ठेवले, तर त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. आठ गोल्ड फिश आणि एक ब्लॅक फिश ही उत्तम रचना असते. याच पद्धतीनं गोल्ड फिश (Gold Fish) अधिक एक ब्लॅक फिश (Black Fish) घेऊन त्यांची बेरीज विषम संख्या येत असेल, तर ही रचना उत्तम ठरते. वास्तू आचार्य श्रीवास्तव यांच्या मते, घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी Arowana प्रकारचे मासे खूप परिणामकारक ठरतात. हे खूप महाग असून त्यासाठी मोठा टँक लागतो. तसंच butterfly koi आणि catfish हे मासेदेखील त्यासाठी उपयोगी पडू शकतात. वास्तू आचार्य मनोज श्रीवास्तव यांच्या मते घरात मत्यालय असल्यामुळे घरातलं वातावरण शांत राहतं. यामुळे घरातली अस्वस्थता, ताण कमी होतो. मत्स्यालयातल्या माशांना फिरताना पाहणं ही एक प्रकारची थेरपी असते. अशा पद्धतीनं माशांना पाहणाऱ्यांचं जीवन सुरळीत चालू राहतं. वास्तूमधली अस्वस्थता आणि मंथनाबाबत (पूर्व आणि आग्नेय दिशांकडचं) मत्स्यालय उत्तम काम करतं. मस्त्यालयातल्या वायू आणि जल तत्त्वाच्या प्रभावामुळे ते पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेलाही ठेवता येतं; मात्र स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये ते कधीच ठेवू नये. लिव्हिंग रूम, ड्रॉइंग रूम आणि स्टडी रूममध्ये मत्स्यालय ठेवता येऊ शकतं. वास्तू आचार्य मनोज श्रीवास्तव यांनी आजवर 400 पेक्षा अधिक मोठ्या व्यावसायिकांना यशाचा मार्ग दाखविला आहे. कॉर्पोरेट लीडरशिपमधला 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले ते जगातले एकमेव वास्तुतज्ज्ञ आहेत. घरात मत्स्यालय ठेवल्यामुळे घराची सजावट होते व सुख-समृद्धीही नांदते; मात्र दोन्हींचा मेळ घालताना त्यातल्या माशांची निवड व रचना कशी असावी, याबाबत तज्ज्ञांचं मत घेतलेलं निश्चितच उपयोगी ठरेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: fish , vastu
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात