मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /परदेशातील नागरिक नियमित पिझ्झा-बर्गर खाऊनही कसं राहतात फिट?

परदेशातील नागरिक नियमित पिझ्झा-बर्गर खाऊनही कसं राहतात फिट?

आपण हे पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, हॉट डॉग यांसारखे पदार्थ जर रोज खाल्ले, तर आपली तब्येत बिघडते

आपण हे पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, हॉट डॉग यांसारखे पदार्थ जर रोज खाल्ले, तर आपली तब्येत बिघडते

आपण हे पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, हॉट डॉग यांसारखे पदार्थ जर रोज खाल्ले, तर आपली तब्येत बिघडते

    नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, हॉट डॉग... नुसती नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं ना? घरी करण्यापेक्षा बाहेरचं तयार हे फास्ट फूड (Fast Food) खाल्लं तर मग आणखीच मजा येते. अगदी लहान मुलांनाही हल्ली नेहमीच्या वरण, भात, पोळी, भाजी या जेवणापेक्षा काही तरी वेगळं हवं असतं.

    खरं तर हे पदार्थ गंमत म्हणून कधी तरी खाल्ले तर चालतं; पण जेवण म्हणून रोजच असे पदार्थ खाल्ले, तर मात्र आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. तरी या विदेशी पदार्थांची क्रेझ काही कमी होत नाही. आपण हे पदार्थ जर रोज खाल्ले, तर आपली तब्येत बिघडते; पण परदेशात मात्र अनेक जण दररोज बाहेरचं हे तयार फास्ट फूड खातात. मग त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम कसा होत नाही, हाच प्रश्न तुमच्याही मनात येत असेल ना! याचबद्दलची माहिती 'टीव्ही 9'नं दिली आहे.

    खरं तर ब्रिटन, अमेरिका, इटलीसारख्या देशांमध्ये जेवण म्हणून बर्गर, पिझ्झा हेच अनेकदा असतं असं सोशल मीडिया, टीव्हीच्या माध्यमातून दिसतं. आपल्याला जेवणात, भात किंवा पोळी लागतेच. त्याचबरोबर भाजी, डाळ आणि चटणी, लोणचं, एखादं सॅलड किंवा कोशिंबीर हवी. म्हणजेच शक्य तितका चौरस आहार हवा असा आग्रह असतो; मात्र परदेशात पिझ्झा, बर्गर हे सर्रास जेवणाच्या वेळेस खाल्लं जातं. फास्ट फूड हे लठ्ठपणा, डायबेटीस, हृदयरोग अशा अनेक आजारांना आमंत्रण देणारं आहे असं आपल्याकडच्या रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे; मात्र परदेशात हेच पदार्थ खाल्ल्यानं लोकांना या समस्या का भेडसावत नाहीत याची काही कारणं आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला जसं घरचं जेवण जेवण्याची सवय अगदी लहानपणापासून असते. तशीच परदेशात अगदी लहानपणापासून बाहेरचं फास्ट फूड खाण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना यात काही वेगळं वाटत नाही. त्यांच्या शरीराला ती सवय होते असं सांगितलं जातं.

    हे ही वाचा-बटाटा खाल्ल्याने खरंच आपण लठ्ठ होतो का?

    आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सवय. भारतात दक्षिणेकडे खाण्याच्या सवयी या उत्तरेकडच्या सवयींपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. दक्षिणेकडे भाताला तर उत्तरेकडे पोळी, रोटीला जास्त महत्त्व आहे. नेमकं हेच विविध देशांबद्दलही आहे. प्रत्येक देशातल्या नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी तिथलं वातावरण, हवामानानुसार आहेत. तिथल्या हवामानानुसार हे पदार्थ खाल्ल्यानं त्या लोकांना त्याचा त्रास होत नाही. आपल्याला जसं पिझ्झा बर्गर सतत खाल्लं, तर त्रास होतो, तसाच त्रास त्यांनाही आपल्याकडचे पदार्थ खाल्ल्यानं होऊ शकतो.

    हे पदार्थ बनवण्याची परदेशातली पद्धत अगदी वेगळी आहे. अगदी पिझ्झाचं उदाहरण घेऊ या..आपल्याकडे बनवला जातो त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीनं पिझ्झा परदेशात बनवला जातो. तिथं पिझ्झाचा बेस हा हलका असतो. त्यामुळे त्याचा शरीरावर वाईट परिणाम कमी प्रमाणात होतो. आपल्याकडे हा बेस अनेकदा मैद्याचा असतो. त्यामुळे तो पचायलाही जड जातो. त्याशिवाय या पदार्थांमध्ये परदेशात काही पोषक अन्नघटकही जातील, याची काळजी घेतली जाते. त्यासाठी त्यात भाज्या वगैरे आवर्जून भरपूर प्रमाणात घातल्या जातात.

    अर्थात परदेशातही लोक काही फक्त फास्ट फूडवरच जगतात असं अजिबात नाही. उलट आपल्यापेक्षा आरोग्याची अधिक काळजी ते घेतात. त्यामुळेच एका जेवणात त्यांनी फास्ट फूड खाल्लं तर त्याची भरपाई म्हणून दुसऱ्या जेवणात ते त्यानुसार भाज्या, चिकन अशा गोष्टी भरपूर खातात. म्हणजेच आपल्या जेवणात ते समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. त्याशिवाय परदेशात फक्त फास्ट फूडच खाल्लं जातं हा समजही चुकीचा आहे.

    सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फास्ट फूड जास्त प्रमाणात खाल्लं जात असलं तरीही परदेशात लोक त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतात. व्यायामाला तिथे अत्यंत महत्त्व आहे. जिम, स्विमिंग, चालणं, सार्वजनिक वाहनांचा वापर करणं अशा गोष्टी परदेशात आवर्जून केल्या जातात. फास्ट फूड किंवा अन्य वेडवाकडं खाणं खाल्लं गेलं असेल त्याची भरपाई भरपूर व्यायाम करून केली जाते.

    एकूणच हवामान, लहानपणापासूनच्या सवयी, प्रथा परंपरा या सगळ्याला अनुसरून त्या त्या ठिकाणची अन्नसंस्कृतीही असते. कधी तरी बदल म्हणून आपल्यापेक्षा वेगळे पदार्थ खाऊन बघणं ही नेहमीच चांगली गोष्ट आहे; पण सतत फक्त फास्ट फूड खाणं हे आपल्याकडे त्रासदायक ठरू शकतं.

    First published:
    top videos

      Tags: Food, Health Tips, Pizza