जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Hair Care Tips : 'हे' केळी हेअर मास्क सोडवेल केसांच्या सर्व समस्या! केस होतील मऊ, दाट आणि चमकदार

Hair Care Tips : 'हे' केळी हेअर मास्क सोडवेल केसांच्या सर्व समस्या! केस होतील मऊ, दाट आणि चमकदार

हे हेअर मास्क बनवणं अगदी सोपं आहे आणि तुमच्या केसांसाठी तितकंच फायदेशीर.

हे हेअर मास्क बनवणं अगदी सोपं आहे आणि तुमच्या केसांसाठी तितकंच फायदेशीर.

Homemade Hair Mask Tips In Marathi : तुम्हाला सलूनमध्ये तासन्तास बसून पैसे आणि वेळ घालवायचे तर आज आम्ही तुमच्यासाठी काही जबरदस्त हेअर मास्क घेऊन आलो आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 जून : केसांची निगा राखण्यासाठी दर महिन्याला पैसे खर्च करणे आणि तरीही अपेक्षित परिणाम न मिळणे तणावपूर्ण असू शकते. तुम्हाला सलूनमध्ये तासन्तास बसून पैसे आणि वेळ घालवायचे तर आज आम्ही तुमच्यासाठी काही जबरदस्त हेअर मास्क घेऊन आलो आहोत. हे हेअर मास्क बनवणं अगदी सोपं आहे आणि तुमच्या केसांसाठी तितकंच फायदेशीर. हे सर्व हेअर मास्क आपण केळीपासून बनवणार आहोत. केळीमध्ये अनेक पोषकतत्व असतात, जे आपल्या केसांना पोषण देतात आणि सुंदर बनवतात. या DIY केळी हेअर मास्क रेसिपीज तुमच्या केसांचे संपूर्ण पोषण करतील. केळी हेअर मास्क कोरड्या आणि कुरळ्या केसांना ओलावा देईल आणि याचबरोबबर इतर फायदे आहेत. चला पाहूया केळी हेअर मास्क कसे बनवायचे.

Morning Tips : सकाळी उठल्यानंतर आधी करा हे काम, चेहऱ्यावर नेहमी दिसेल नैसर्गिक चमक

केळी-कोरफड-खोबरेल तेल-मध हेअर मास्क केळ्याचे हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वात आधी तुमच्या केसांच्या लांबीनुसार केळी घ्या आणि ती एका बाऊलमध्ये मॅश करा. यानंतर त्यात ताजा कोरफडीचा गर टाका. यानंतर त्यात सुमारे 2 ते 3 चमचे खोबरेल तेल आणि 2 चमचे मध घाला. सर्व गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट बनवा. आता तयार हेअर मास्क टाळूवर आणि केसांवर चांगले लावा. 20 ते 40 मिनिटे हेअर मार्क राहू द्या आणि त्यानंतर केस साध्या पाण्याने धुवा. केस साध्या पाण्याने धुवून झाल्यानंतर माईल्ड शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवा. तुम्ही हेअर मास्क आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता. यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार होतात.

News18लोकमत
News18लोकमत

केळी-ऑलिव्ह तेल हेअर मास्क एक पिकलेले केळे चमच्याने मॅश करा. 2 टेस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल घाला आणि चांगले मिसळा. आपल्या संपूर्ण टाळू आणि केसांना मिश्रणाने कोट करा. 20 मिनिटे बसू द्या, आता शॅम्पू वापरून आपले केस थंड पाण्याने धुवा. केळी-पपई-मध हेअर मास्क एक पिकलेले केळ, 4-5 पपईचे तुकडे घ्या आणि व्यवस्थित मॅश करा. मिश्रणात २ चमचे मध घाला. मऊ पेस्ट बनवा आणि टाळूला लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर केस शॅम्पूने धुवा.

Summer Tips : उन्हाळ्यातील अनेक त्रासांवर रामबाण उपाय आहे हे पीठ! शरीराला मिळेल थंडावा

केळी-अंडी-मध हेअर मास्क दोन पिकलेली केळी मॅश करा, त्यात एक अंडे, 2 चमचे मध घाला आणि मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. अंड्याचा वास कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्याही इसेन्शियल ऑईलचे काही थेंब टाकू शकता. आपल्या टाळू आणि केस हे मिश्रण लावून 20 मिनिटे राहू द्या. यानंतर केस पाण्याने आणि शॅम्पूने चांगले धुवा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात