मुंबई, 16 ऑगस्ट : जर तुमच्या पायांना सूज आली असेल. परंतु त्यांना वेदना होत नसेल तर ही एक सामान्य समस्या आहे. सहसा ही समस्या अशा लोकांमध्ये दिसून येते जे कोणत्याही वैद्यकीय स्थितीत आहेत किंवा ज्यांचे वजन जास्त आहे. गरोदरपणातही महिलांच्या पायाला सूज येते. याशिवाय चुकीच्या आकाराचे शूज किंवा काही जीवनशैलीमुळे पायांना सूज येऊ शकते. हेल्थलाईननुसार, जेव्हा टिश्यूमध्ये द्रव जमा होतो तेव्हा त्याला ‘एडेमा’ म्हणतात आणि यामुळेच पाय सुजतात. हे वेदनारहित आहे आणि आपोआप होते. परंतु काहीवेळा ते अडचणी निर्माण करू शकतात. पायांची सूज कमी करण्याचे नैसर्गिक मार्ग दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या शरीरात पाणी कमी झाल्यामुळे पायात सूज येण्याची समस्याही सुरू होते. पण जेव्हा तुम्ही दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्याल तेव्हा ते शरीर हायड्रेट ठेवते आणि सूज कमी होते.
Mushroom Veg Or Non-Veg : मशरूम व्हेज आहे की नॉनव्हेज? हे आहेत मशरूम खाण्याचे फायदे आणि तोटेकम्प्रेस्ड मोजे वापरणे कम्प्रेस्ड मोजे काही तासांसाठी पायात घाला. आपण ते ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. कम्प्रेस्ड मोजे घातल्याने पायातील रक्तप्रवाह चांगला राहतो आणि सूज कमी होते. उशीवर पाय ठेवा जर तुम्ही तासनतास उभे राहून काम करत असाल आणि पाय सुजत असतील तर तुम्ही बेडवर झोपा आणि पाय उशीवर ठेवा. असे केल्याने पायांची सूज दूर होऊ लागते. मॅग्नेशियम समृद्ध अन्न तुमच्या आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी काजू, बदाम, ब्रोकोली, डार्क चॉकलेट इत्यादींचा आहारात समावेश करावा. वजन कमी वजन वाढल्याने रक्तप्रवाहात समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनेकवेळा पायात सूज येण्याची समस्या निर्माण होते. Avoid food in dinner: रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खायचे टाळा; लाँग लाईफ निरोगी राहू शकाल पोटॅशियमचा आहारात समावेश करा अनेक वेळा शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पायांना सूज येण्याची स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत केळी, रताळी इत्यादींचा आहारात समावेश करा.

)







