• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • मेकअपने लपवू नका तर तेल लावा; अनावश्यक तीळ, चामखीळापासून मिळवा कायमची मुक्ती

मेकअपने लपवू नका तर तेल लावा; अनावश्यक तीळ, चामखीळापासून मिळवा कायमची मुक्ती

अगदी घरगुती उपायांनी तुम्ही अनावश्यक तीळ, चामखीळ हटवू शकता.

  • Share this:
मुंबई, 16 सप्टेंबर : चेहऱ्यावर योग्य ठिकाणी असलेल्या तिळामुळे (Mole) सौंदर्य खुलतं. काही स्त्रिया तर चेहऱ्यावर कृत्रिमरीत्याही तीळ तयार करून घेतात (Mole on face).  पण काही जणांच्या म्हणजे स्त्री आणि पुरुष अशा कोणाच्याही चेहऱ्यावर आणि शरीरावरही अनेक ठिकाणी तीळ, तसंच मस असतात (Home remedies for mole). त्यामुळे सौंदर्य खुलण्याऐवजी विचित्र दिसतं आणि यामुळे काही जणांमध्ये न्यूनगंडही निर्माण होऊ शकतो (Unwanted Mole Remover). मग तो हटवण्यासाठी उपाय केले जातात (Treatment for mole). असे अनावश्यक तीळ किंवा मस काढून घेण्यासाठी सर्रास शस्त्रक्रिया केल्या जातात. आपल्याकडेही तशा सर्जरीज (Surgery) केल्या जातात. मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्तींनाच ते करणं शक्य असतं. पण काही घरगुती उपायांनीही तीळ किंवा मस काढून टाकायला मदत होऊ शकते. हे उपाय खर्चिक नाहीत, त्याचे काही अपाय नाहीत आणि कोणालाही घरच्या घरी करणं शक्य आहे. शरीरावरचे तीळ किंवा मस काढून टाकण्याचे काही उपाय येथे सांगत आहोत. हे उपाय म्हणजे वैद्यकीय उपचार नव्हेत, हे कृपया लक्षात घ्यावं. हे मस किंवा तीळ काढून टाकण्यासाठी एरंडेल तेलाचा (Castor Oil) चांगला उपयोग होतो. एरंडेल तेलाचं विविध घटकांमध्ये मिश्रण करून वापरल्यास ते उपयुक्त ठरतं. हे वाचा - Yoga for hair: दररोज पाच मिनिटे 'हा' योग केल्याने थांबू शकतं केस गळणं - अर्धा चमचा सुंठ पावडरमध्ये दोन-तीन थेंब एरंडेल तेल मिसळावं. त्याची पेस्ट तयार होईल. जो मस किंवा तीळ काढून टाकायचा आहे, त्यावर ही पेस्ट लावून काही तास ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवावा. दिवसातून दोनदा असं केलं, तर चांगले परिणाम दिसतील. - अर्धा चमचा बेकिंग सोड्यात (Baking Soda) रात्री दोन-तीन थेंब एरंडेल तेल मिसळावं आणि त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट मस किंवा तिळावर लावावी आणि त्यावर बँडेज लावावं. हे रात्रभर तसंच ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बँडेज काढून चेहरा धुवावा. एक दिवसाआड हे तंत्र वापरावं. म्हणजे काही दिवसांनी परिणाम दिसेल. हे वाचा - रोज एक केळ खाणं आहे खूपच उपयुक्त; महिलांना होऊ शकतात हे लाभ - एक चमचा एरंडेल तेलात तीन-चार थेंब टी-ट्री ऑइल (Tea Tree Oil) मिसळावं. हे मिश्रण कापसानं मस किंवा तिळावर लावावं. ते तीन-चार तास तसंच ठेवावं. त्यानंतर चेहरा धुवावा. दिवसातून दोन वेळा असं केल्यास लवकर परिणाम दिसेल. - एक चमचा मधात (Honey) दोन-तीन थेंब एरंडेल तेल मिसळावं आणि हे मिश्रण मस किंवा तिळावर लावावं. त्यावर बँडेज लावावं आणि काही तासांनी ते काढून टाकावं. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. दिवसातून दोनदा असं केल्यास सात-10 दिवसांत चांगले परिणाम दिसतील. Disclaimer - सदरचा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
First published: