जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लघवी करताना किंवा सेक्सनंतर PENIS मध्ये वेदना; घरगुती उपचारांनी मिळवा आराम

लघवी करताना किंवा सेक्सनंतर PENIS मध्ये वेदना; घरगुती उपचारांनी मिळवा आराम

लघवी करताना किंवा सेक्सनंतर PENIS मध्ये वेदना; घरगुती उपचारांनी मिळवा आराम

घरगुती उपायांनी तुम्ही Penis pain वर आराम मिळवू शकता.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    पुरुषांच्या जननेंद्रियामध्ये अनेकदा अधूनमधून वेदना होत असतात. हे कोणत्याही कारणामुळे होऊ शकतं. आजारपण, दुखापत किंवा संसर्गामुळे, जखमेमुळे होणारी वेदना किंवा अगदी अस्वस्थता याला कारणीभूत ठरू शकते. लघवी करताना किंवा वीर्यपात दरम्यान वेदना होत असल्यास ही एक गंभीर समस्या आहे. समस्येकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. परंतु वेदना झाल्यास काही घरगुती उपचारांद्वारेदेखील या वेदना कमी होऊ शकतात. घरगुती उपचारांद्वारे पुरुषांची जननेंद्रिय दुखणं काही प्रमाणात कमी होऊ शकतं. पुरुषांच्या जननेंद्रियामधील वेदनांची कारणं पुरुषांमध्ये बॅलेनिटिस, लैंगिक संबंधातून पसरणारे आजार, मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग, कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा कर्करोग यासारखा कोणताही गंभीर रोग असल्यास पुरुषांच्या जननेंद्रियांमध्ये या आजारांमुळे वेदना होऊ शकतात. myupchar.com च्या नुसार, पुरुषाचे जननेंद्रिय शेकल्याने देखील ही वेदना कमी होते. यासाठी स्वच्छ टॉवेल घेऊन त्यात बर्फाचे तुकडे ठेवून जननेंद्रिय शेकू शकता. पुरुषांच्या जननेंद्रियात वेदना आणि सूज झाल्यास जीवनसत्त्व ई युक्त क्रीम त्यावर लावली जाऊ शकते. यामुळे दाह कमी होईल. हे वाचा -  ती सध्या ‘कुणाशी’ बोलते; बायको सतत फोनवर असल्यानं तुमच्या मनातही असा संशय? पुरुषांची जननेंद्रिय दुखत असल्यास सैल अंडरवेअर आणि कपडे घाला. याने घाम येण्यास प्रतिबंध होतो, ज्यामुळे जीवाणू देखील उत्पन्न होत नाहीत. वेदना कमी होईपर्यंत किंवा संपेपर्यंत लैंगिक संबंध टाळा. इनुप्रोफेनसारख्या नॉन स्टेरॉइडल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी औषधं पुरुषाच्या जननेंद्रियातील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी घेतली जाऊ शकतात. जर आपल्याला एखाद्या संसर्गामुळे वेदना होत असेल तर आपण पुरुषाच्या जननेंद्रियावर दही किंवा अॅपल सिडर व्हिनेगरदेखील लावू शकता. यामुळे संसर्गदेखील दूर होतो ज्यामुळे वेदना होणार नाहीत. पुरुषातील जननेंद्रिय वेदनांपासून बचाव करण्यासाठी काय करावं? पुरुषांची जननेंद्रिय नियमितपणे साफ करणं फार महत्त्वाचं आहे. कारण स्वच्छता न ठेवल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. संभोगाच्या वेळी कंडोम वापरून संक्रमित व्यक्तीशी शारीरिक संबंध न ठेवता संभोगाच्या वेळी वाकलेली किंवा ताणलेली स्थिती टाळल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. हे वाचा -  पुरुषांच्या प्रत्येक सेक्स समस्येवर होमिओपॅथिक उपचार; उपयुक्त अशी 6 औषधं मूत्रमार्गात सूज येणं, जळजळ होणं किंवा खाज सुटणं यासारख्या काही समस्या असल्यास या काळात आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध करणं टाळा. वैद्यकीय सल्लामसलत आवश्यक myupchar.com शी संबंधित डॉ. अनीश कुमार गुप्ता यांच्या मते, जर एखाद्या पुरुषाला उत्सर्ग किंवा वीर्यपात दरम्यान वेदना होत असेल किंवा स्पर्श केल्यास वेदना होत असतील तर डॉक्टरांकडून त्वरित त्याची तपासणी करून घ्यावी. या व्यतिरिक्त लघवीतून रक्तस्त्राव होणं, वीर्याचा रंग बदलणं, पुरुषांच्या जननेंद्रियाभोवती पुरळ उठणं, एनोरेक्सिया इत्यादी त्रासदायक देखील असू शकतात ज्याकडे दुर्लक्ष करू नये. हा त्रास एखाद्या गंभीर समस्येमुळे देखील उद्भवू शकतो, जसं की पुरुषाच्या जननेंद्रियातील नसा खूप दाठ होतात. याव्यतिरिक्त पुरुषाचं जननेंद्रिय किंवा अंडकोष यामध्ये गाठी तयार होतात. जर यापैकी कोणत्याही समस्येचा संशय आला असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जावे. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - पुरुषाच्या लिंगाचा विकार (पेनिस डिसऑर्डर) न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात