जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care : चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कसे कमी करायचे? 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम

Skin Care : चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कसे कमी करायचे? 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम

स्किन केअर

स्किन केअर

केमिकल बेस्ड प्रॉडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही त्वचा तजेलदार करण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेतल्यास त्याचा फायदा होतो. काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 04 ऑक्टोबर :  तरुणपणात प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो; पण वय जसजसं वाढतं तसतसं त्वचेकडे दुर्लक्ष होऊ लागतं. त्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. आधीच वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाइन्स, डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स अशा समस्या उद्भवू लागतात. त्यात त्वचेची नीट काळजी घेतली नाही, की या समस्या आणखी वाढतात. त्यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. परिणामी आत्मविश्वासही कमी होतो. चेहऱ्यावरचे डाग मेकअपने लपवण्याचा प्रयत्न होतो; पण तो फक्त तात्पुरता उपाय आहे. केमिकल बेस्ड प्रॉडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही त्वचा तजेलदार करण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेतल्यास त्याचा फायदा होतो. त्या उपायांच्या मदतीने चेहरा चमकदार बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या त्यासाठीचे आयुर्वेदिक घरगुती उपाय. - वाढत्या वयाबरोबर त्वचा पातळ होते. त्यामुळे तिची लवचिकता कमी होते. अशा परिस्थितीत, त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास चेहरा लवकर रिकव्हर होत नाही. ही समस्या वयाच्या चाळिशीनंतर उद्भवते. सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना वयाच्या 20व्या वर्षीही चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. हेही वाचा - कच्चे गाजर खाण्याचे शरीरासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या - चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचं कारण जास्त वेळ उन्हात राहणं हेदेखील आहे. कारण सूर्याच्या तीव्र किरणांमुळे कोलेजन आणि इलॅस्टिसिटी कमी होऊ लागते. या दोन्ही गोष्टी त्वचेला बांधून ठेवण्याचं काम करतात. - चेहऱ्यावर चमक कायम राहावी, असं वाटत असेल, तर सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर त्वचेला हलका मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर फ्रेशनेस येईल आणि असं रोज केल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतील. - याशिवाय सकाळी उठल्याबरोबर चेहरा दुधाने स्वच्छ करा. तुमची त्वचा कोरडी असेल तर हे रोज करा. यामुळे त्वचेवरची छिद्रं सुकणार नाहीत. हा सर्वांत किफायतशीर आणि प्रभावी उपाय आहे. - स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हे कोरड्या आणि तेलकट दोन्ही प्रकारची त्वचा असलेल्यांना लागू आहे. शरीरातला ओलावा टिकवून ठेवण्याचा हा सर्वांत नैसर्गिक पर्याय आहे. त्यामुळे हे काम आधी करा. याशिवाय तुमच्या आहारावरही विशेष लक्ष द्या. आपल्या आहारात व्हिटॅमिन सीसारख्या पदार्थांचा समावेश करा, जेणेकरून शरीराला आवश्यक प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स मिळत राहील.

    News18लोकमत
    News18लोकमत

    हे काही घरगुती उपाय वापरून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. home remedies reduce dark spots and dark circles on the face

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात