मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /या 3 गोष्टी देतील अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम; अगदी सोपे आहेत उपाय

या 3 गोष्टी देतील अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम; अगदी सोपे आहेत उपाय

छातीत जळजळ, गॅस, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटदुखी असे त्रास होतात. यातून सुटका होण्यासाठी, लोक वेगवगेळ्या प्रकारची औषधं घेतात. पण त्यानेही अॅसिडिटी आणखी वाढतेच.

छातीत जळजळ, गॅस, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटदुखी असे त्रास होतात. यातून सुटका होण्यासाठी, लोक वेगवगेळ्या प्रकारची औषधं घेतात. पण त्यानेही अॅसिडिटी आणखी वाढतेच.

छातीत जळजळ, गॅस, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटदुखी असे त्रास होतात. यातून सुटका होण्यासाठी, लोक वेगवगेळ्या प्रकारची औषधं घेतात. पण त्यानेही अॅसिडिटी आणखी वाढतेच.

    नवी दिल्ली, 21 जुलै: आजकाल पित्त म्हणजेच अ‍ॅसिडिटीची (Acidity) समस्या सामान्य झाली आहे. अनेकांना ही समस्या सतावत असते. कामाचा अती ताण, जेवणाच्या अनिश्चित वेळा, जंक फूड, तेलकट, अती तिखट पदार्थ खाणं, अपुरी झोप अशा अनेक कारणांमुळे पित्त म्हणजेच अ‍ॅसिडिटी होते. यामुळे छातीत जळजळ, गॅस, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटदुखी असे त्रास होतात. यातून सुटका होण्यासाठी, लोक वेगवगेळ्या प्रकारची औषधे वापरतात. ज्यामुळे त्वरित आराम मिळतो; परंतु या औषधांचे काही दुष्परिणाम होण्याचा धोकाही असतो. आपल्याकडे यावर काही घरगुती उपायही(Home Remedy) पूर्वापार चालत आलेले आहेत. घरीच सहजपणे उपलब्ध असणाऱ्या औषधी गुणधर्माच्या विविध पदार्थांचा वापर करून अ‍ॅसिडिटीसारखे अनेक आजार दूर करता येतात. अशा काही पदार्थांचा वापर करून आपल्याला अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम (Instant Relief From Acidity) मिळू शकेल तसंच कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होण्याचा धोकादेखील टाळता येतो.

    गूळ :

    अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी गूळ(Jaggry) उपयुक्त ठरतो. जेवण झाल्यानंतर थोडासा गूळ खाल्ल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. गूळ तसाच किंवा पाण्यात विरघळवून ते पाणी उकळवून पिऊ शकता. गुळामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, पोटॅशियम आणि तांबे यासारखे बरेच गुणकारी घटक असतात, जे अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत करतात.

    चुकूनही खरेदी करू नका माती न लागलेलं स्वच्छ आलं कारण...

    गूळ पोटात म्यूकस अर्थात श्लेष्माचा एक गुळगुळीत थर निर्माण करते. हा थर पोटातील बाहेरील आणि आतील स्तरांचं पेप्सिन आणि हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडपासून संरक्षण करतो.

    दालचिनीचा चहा :

    दालचिनीचा(Cinnamon) चहा (Tea) अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम देतो. याकरता एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळा आणि चांगले उकळा. हवा असल्यास गोडपणासाठी त्यात थोडासा गूळ घाला. हा चहा पिल्यास अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळेल.

    ओव्याचा वापरही उपयुक्त :

    अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी ओवादेखील(Ajwain) अतिशय गुणकारी आहे. ओव्यामुळे छातीत होणारी जळजळ, आंबट ढेकर, डोकेदुखी, गॅस आणि ओटीपोटात दुखणे अशा सगळ्या त्रासांपासून सुटका होऊ शकते. ओवा खाल्ल्यानं पचन चांगलं होतं, हे सर्वजण जाणतोच. अ‍ॅसिडिटीवरही ओवा लाभदायी आहे. यासाठी एक चमचा ओवा बारीक करून खाऊ शकता, किंवा तो भाजून घेऊन खाऊ शकता. तसंच एक चमचा ओवा पाण्यात घालून ते पाणी उकळून घ्यावं आणि प्यावं यानंही फरक पडेल.

    First published:
    top videos

      Tags: Health, Home remedies