• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कान खाजतो म्हणू त्रस्त आहात? घरगुती उपाय नक्कीच करून पाहा...

कान खाजतो म्हणू त्रस्त आहात? घरगुती उपाय नक्कीच करून पाहा...

कानात येणाऱ्या सततच्या खाजेमुळे त्रस्त आहात, तर आजच हे काही घरगुती आणि सोप्पे उपाय करून पाहा. ( Home Remedies For Ears Itching)

 • Share this:
  मुंबई, 28 ऑक्टोबर : बऱ्याचदा कानात पाणी गेल्यामुळे, वॅक्स जमा झाल्यामुळे, इंफेक्शन किंवा टॉन्सिल वाढल्याने, इअरबड घातल्याने, कानात काड्या घालण्याने कानदुखीची ( Eear Itching )समस्या उद्भवते. यामुळे ऐकू कमी येणं, सतत खाज सुटणे, कान शिवशिवणे असं सातत्याने आपल्याला वाटत असतं. आपण जर यावर योग्य वेळी लक्ष दिले नाही तर ही समस्या अधिक वेदनादायक ठरू शकते. त्यामुळे ही समस्या जर निमुळती असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा, अथवा तुम्हाला यातूनही आराम मिळत नसेल तर, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  कोरोनानंतर ब्रिटिशांचा नवीन ‘5:2 डाएट’; खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काय बदल झालाय?

  कानात हलक्या हातानं गरम पाण्याचा शिडकाव करावा. पण कानात पाणी जाऊ देऊ नये. बाहेरूनच पाण्याचा मारा करावा. यामुळे आतमध्ये तयार झालेली घाण हलकीशी सुट्टी होते. असे गरम पाणी अगदीच फोर्स मध्ये कानात घालू नये, याजागी एका रिकाम्या सिरींज मध्ये गरम पाणी भरून ते हळू हळू कानात सोडावे. व नंतर एका सुक्या कपड्याने कानातले पाणी काढून कान साफ करून घ्यावा. मोहरीचे तेल हलके गरम करुन त्याचे काही थेंब कानात सोडा. थोड्याच वेळात आराम मिळेल. व कानातली घाण सुद्धा निघेल. व कानदुखी हे मोहरीचे तेल उपायकारक ठरेल. मोहरीच्या तेलाऐवजी बदामाचे तेलही वापरले तरी हरकत नाही. कानदुखी ची समस्या दुर करण्यासाठी ब्लो ड्राय देखील वापरला जातो. बऱ्याचदा कानात पाणी साचून राहिले की घाण जमा होते, मग आपण बलो ड्राय कान सुखवू शकतो. त्यामुळे कानात खाज येणे कमी होईल.

  Dengue: सावधान! विशिष्ट वेळी आणि ठराविक ठिकाणी चावतात डेंग्यूचे डास

  इंफेक्शनमुळे कान दुखत असेल तर यावर कांदा अतिशय उपयुक्त आहे. कांद्याचा रस काढून तो हलका गरम करा आणि त्याचे 1-2 थेंब कानात घाला. यामुळे कानात होणारी खाज व कान शिवशिवणे यावर आराम मिळेल. यासर्वांपासून कानाला खाज किंवा इन्फेक्शन होण्यापासून वाचवायचे असेल तर, नियमीत कान साध्या कपड्याने पुसून घ्या. अंघोळीवरून आल्यानंतर कानात साबण, पाणी तर साचून राहणार नाही ना याची काळजी घ्या. शक्यता इअर बर्ड ( Ear Bud )वापरणे टाळा. Disclaimer: ही माहिती सामान्यपणे उपलब्ध ज्ञानावर आधारित आहे.  News18 याचं समर्थन करतेच असं नाही. कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
  Published by:Trending Desk
  First published: