मुंबई, 11 डिसेंबर : आपलं घर सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. घराच्या सजावटीसाठी सर्वजण आपल्या आवडीनुसार, ऐपतीनुसार खर्च करत असतात. बदलत्या काळातील आधुनिक घरांपासून, जुन्या काळातील पारंपारिक पद्धतीनं घराची सजावट केलेली आपण पाहतो. घराच्या इंटेरिअर डोकेरेशनसाठी वेगवेगळ्या भागातून वस्तू खरेदी करत असतो. मुंबईच्या वांद्रे पश्चिममध्ये लाकडावर कोरलेले विविध फ्रेम्स, डिझाईनर वॉल वूड मिळतात. त्या वस्तूंच्या आधारे तुम्ही तुमचं घरं सुंदर करू शकता. कसं करतात काम? सागवान लाकूड, शिसम या लाकडांवर कोरीव काम केले जाते. या लाकडापासून काय बनवायचं आहे याचा विचार करुन त्याला त्या पद्धतीनं कापलं जातं. कोरीवकामाचे वेगवेगळे उपकरणं वापरुन त्याला छिललं जातं. त्यानंतर त्यावर फिनिशिंगचे काम करुन पॉलिश केले जाते. वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिसमधल्या जिन्याची रचना कशी असावी? कोणत्या वस्तू बनवतात? आरश्याच्या फ्रेम लहानपासून अगदी हव्या त्या आकारात, फोटोफ्रेम, पेंटिंग फ्रेम, वॉलपेपरला वूडन प्लेट्स हा नवीन पर्याय आता उपलब्ध झालाय. घरातील भिंतीचं योग्य माप घेऊन ते तयार केलं जातं. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या ऑर्डरनुसार येथे वेगवेगळ्या वस्तूही बनवल्या जातात. वांद्रे स्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराबाहेर निघाल्यावर 1 किलोमीटर अंतरावरच या दुकानाची रांग आहे. लहान मोठ्या आकाराचे हवे तसेच इंटेरिअर येथे मिळतात. वस्तूंची किंमत काय? या ठिकाणी असेलल्या फ्रेम्सची किंमत 150 रुपये ते 5000 रुपये इतकी आहे. डिझाईनर वूडन प्लेट्स स्क्वेअर फूटच्या दर प्रमाणे मिळतात. 2000 रुपये प्रति स्क्वेअर फूट पासून त्याचे दर सुरु होतात. घरामध्ये, बाल्कनीत लावा ही खास झाडं; 24 तास मिळेल मुबलक ऑक्सिजन ‘मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आमच्याकडे लोकं खरेदीसाठी येतात. एक फ्रेम बनवायला साधारण 2 तास जातात. मोठं काम असेल तर 2-3 दिवस लागतात. आम्ही कस्टमाईज पद्धतीने सुद्धा या सर्व गोष्टी बनवून विकतो. आमच्याकडे असलेल्या कॅटलॉगमधून किंवा ग्राहकांनी दिलेल्या डिझाईन्स आम्ही बनवून विकतो. हे सर्व करत असताना आम्हाला आमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते. यामधून निघणारी धूळ नाकातोंडा वाटे शरीरात जाते त्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची भीती असल्यानं विशेष खबरदारी घ्यावी लागते ‘, असं या दुकानातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.