कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी पडू लागल्यानंतर सगळ्यांनाच ऑक्सिजनचं महत्त्व कळालं होतं. आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन सहजपणे उपलब्ध असतो, त्यामुळे आपल्याला त्याचं तितकं महत्त्व लक्षात येत नाही.
ऑक्सिजन घरामध्येच उपलब्ध करून देणारे काही इनडोअर प्लॅन्ट आहेत. ज्यामुळे घरात पॉझिटिव्ह वातावरण राहू शकतं आणि 24 तास ऑक्सिजनही मिळतो.
सान्सेवीरिया (Sansevieria) या इंडोअर प्लॅन्टला स्नेक प्लॅन्ट किंवा मदर एन लॉज टंग देखील म्हटलं जातं. हे झाड 24 तास ऑक्सिजन देत. त्यामुळे अगदी बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही हे रोप ठेवू शकता. शिवाय कमी पाणी आणि खूप कमी सूर्यप्रकाशामध्ये हे जगतं.
एंथ्युरियम (Anthurium) हे एक परदेशी झाड आहे. एंथ्युरियम हवेमधून फॉर्मलाडेहाइड,अमोनिया,टोल्यूनी आणि जायलीम हवेमधून दूर करते. त्यामुळे हे झाड घरामध्ये लावल्याने फायदा होतो.
चायनीज एवरग्रीन (chinese evergreen) नावाप्रमाणेच हे रोप सतत टवटवीत दिसतं. हे झाड घरात ठेवलं तर, घरामधील विषारी वायूचं शोषण करतं. त्याशिवाय घरातलं उदास वातावरण दूर होऊन सकारात्मकता निर्माण होते.चायनीज एवरग्रीन (chinese evergreen) नावाप्रमाणेच हे रोप सतत टवटवीत दिसतं. हे झाड घरात ठेवलं तर, घरामधील विषारी वायूचं शोषण करतं. त्याशिवाय घरातलं उदास वातावरण दूर होऊन सकारात्मकता निर्माण होते.
स्पाइडर प्लांट (Spider plant) हे एक आफ्रिकन रोप आहे. याला क्लोरोफायटम कोमोसम असं देखील म्हटलं जातं. ते झाड सुद्धा घरातील विषारी वायू शोषून घेऊन ऑक्सिजन पुरवठा करत. शिवाय आयुर्वेदात देखील या झाडाला महत्त्व आहे.
पीस लिली (Peace lily) हे रोप दिसायला अतिशय सुंदर असतं. हिरव्या रंगाची पानं आणि त्यामध्ये आलेली सफेद रंगाची कोंब यामुळे मनाला शांती मिळते. म्हणूनच त्याला पिस लिली म्हटलं जातं. हे रोप कार्बन मोनॉक्साईड आणि बेंजीन सारखे वायु शोषून ऑक्सिजन देत.
अरलिया (Arelia) हा इंनडोअर प्लॅन्ट औषधी गुणधर्मांनीयुक्त आहे. पुरूषांमधील नपुंसकत्व दूर करण्यासाठी या झाडाच्या पानांचा वापर होतो. हे रोप घरामध्ये ठेवल्यामुळे फ्रेश फिल होतं. घरातलं टेन्शन फ्री राहतं.