नवी दिल्ली, 15 मार्च : होळी (holi 2022) हा सण मौजमजेसोबतच फॅशन (Fashion) सिम्बॉल बनत चालला आहे. शहरांमध्ये होळीच्या पार्ट्यांमध्ये मुलींना कूल ड्रेस कॅरी करायला आवडतो, तर मुलंही हॉट-हंक दिसण्यासाठी स्टाइल गाइड (Style Guide) आणि फॅशन ट्रेंड (Trend) फॉलो करतात. होळीच्या दिवशी स्टायलिश दिसण्यासाठी बॉलीवूडची होळी फॅशन देखील खूप ट्रेंडमध्ये आहे, होळीच्या पार्ट्यांमध्ये तरुणांकडून ती खूप फॉलो केली जाते. अनेकजण होळीसाठी चित्रपटातील होळी स्टाइल कपडे वापरण्याचा प्रयत्न करतात, मात्र रियल लाईफमध्ये वापरताना ते तेवढे आकर्षक दिसत नाहीत. जाणून घेऊया होळीच्या दिवशी स्टायलिश आणि हँडसम दिसण्यासाठी पुरुषांनी कोणता ट्रेंड फॉलो (Holi Style Guide For Men ) करावे.
पुरुषांनी होळीमध्ये स्मार्ट दिसण्यासाठी
पांढरा शर्ट घाला
होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला तर तो तुम्हाला सणासुदीचा लुक देईल. पांढरा शर्ट तुमचा लुक छान करेल आणि त्यावर होळीचे रंग उधळले जातील तर ते अधिक छान दिसेल. अनेकजण पांढरा शर्ट घालत नाहीत, मात्र पांढऱ्या शर्टावर लागलेले वेगवेगळे रंग आकर्षक दिसतात.
कॅज्युअल पॅन्ट किंवा जीन्स
तुम्ही शर्टशी जुळणारी कॅज्युअल पँट किंवा जीन्स घालू शकता. ती व्यवस्थित बसणारी पण खूप घट्ट नाही याची खात्री करा.
होळीसाठी टी शर्ट
होळीसाठी तुम्ही खास पांढऱ्या टी-शर्टवर हॅप्पी होलीचे ग्राफिक्स बनवू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही होळी खेळण्यासाठी एक साधा पांढरा टी-शर्ट देखील घालू शकता. तो खूप सुंदर दिसेल आणि टी शर्टमुळे तुम्हाला आरामदायी वाटेल. तुम्ही घोट्याच्या लांबीच्या पँट, जीन्स किंवा शॉट्ससोबत कॅरी करू शकता.
सुती कुर्ता
होळीमध्ये कुर्ता घालण्याची फॅशन तशी फार जुनी आहे. सुती कुर्ता होळीसाठी सर्वोत्तम मानला जाऊ शकतो. हवे असल्यास शर्ट स्टाईल कुर्ता, शॉर्ट कुर्ता घालू शकता. तुम्ही त्यांच्यासोबत पायजामा किंवा जीन्स घालू शकता.
हे वाचा - Salt Water : मिठाचे पाणी अनेक आजारांवर आहे गुणकारी, वाचा हे महत्त्वाचे फायदे
फ्लोरोसेंट सनग्लासेस
तुम्ही कोणत्याही प्रकारच्या इंडो वेस्टर्न ड्रेससोबत फ्लोरोसंट कलरचा सन ग्लास कॅरी करू शकता. यामुळे तुमचा लूक तर वाढेलच, शिवाय तुमचे डोळे सूर्यप्रकाश आणि रंग-गुलालापासूनही वाचतील.
हे वाचा - पायी चालणं आपण पूर्ण विसरलोय; भविष्यात वाईट घडण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या
रबर स्लीपर
होळी खेळण्यासाठी रबरी स्लीपर वापरणं चांगलं. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डिझाइनचे स्लीपरही घालू शकता. मात्र, ते घसरणारे नसावेत याची खात्री करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.