Home /News /lifestyle /

पायी चालणं आपण पूर्ण विसरलोय; भविष्यात वाईट घडण्यापूर्वी आजपासूनच या गोष्टींची काळजी घ्या

पायी चालणं आपण पूर्ण विसरलोय; भविष्यात वाईट घडण्यापूर्वी आजपासूनच या गोष्टींची काळजी घ्या

वेगाने किंवा हळू चालता, किती पावले चालता यापेक्षा नियमित चालणे महत्त्वाचे आहे. मात्र, तरीही चालताना किंवा धावताना वेग कमी जास्त करण्याने कॅलरीज जास्त बर्न होतात. चालण्यामुळे अकाली मृत्यू (premature death) होण्याचा धोकाही टळू शकतो.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 14 मार्च : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बहुतेक लोकांना आरोग्यासाठी खूप काही करायला वेळ नसतो. म्हणून चालणं हा त्यांच्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. कारण यासाठी तुम्हाला तुमच्या रुटीनपेक्षा वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वाहन वापरण्याऐवजी तुम्ही चालत जाऊन तुमच्या कॅलरीज बर्न करू शकता. चालणं हा तसा सर्वात सोपा आणि चांगला व्यायाम प्रकार आहे आणि त्याचे अनेक फायदे (Benefits of walking) देखील आहेत. अमेरिकन विद्यापीठातील संशोधकांच्या विश्लेषणात्मक अभ्यासातून असं आढळून आलं आहे की, चालणं अकाली मृत्यूचा धोका कमी करतं. मॅसॅच्युसेट्स अॅमहर्स्ट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष 'लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नल'मध्ये (The Lancet Public Health Journal) प्रकाशित झाले आहेत. हे विश्लेषण सार्वजनिक आरोग्यासाठी शारीरिक हालचालींच्या फायद्यांचा पुरावा-आधारित जागृतीसाठी केलं गेलं आहे. तज्ज्ञ काय म्हणतात युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स अॅमहर्स्ट (University of Massachusetts Amherst) फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी एपिडेमियोलॉजिस्ट अमांडा पालुच (Amanda Paluch) यांच्या मते, वेगवेगळ्या वयोगटांसाठी पाऊलांची संख्या वेगळी असते. विशेष म्हणजे, आपण किती पाऊले चालतो आणि चालण्याचा वेग याला फार महत्त्व नाही. म्हणजे, तुम्ही किती वेगाने किंवा हळू चालता, किती पावले चालता यापेक्षा नियमित चालणे महत्त्वाचे आहे. मात्र, तरीही चालताना किंवा धावताना वेग कमी जास्त करण्याने कॅलरीज जास्त बर्न होतात. चालण्यामुळे अकाली मृत्यू (premature death) होण्याचा धोकाही टळू शकतो. हे वाचा - डोळ्यांच्या सिंपल मेकअपसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स; अनेक प्रसंगी येतील कामी अमांडा पालुच यांनी, चालणे ही चांगली शारीरिक क्रिया आहे, हे पुराव्यावर आधारित सांगितलं. चालणं किती फायदेशीर आहे ट्रॅक करणं देखील खूप सोपं आहे आणि अनेक फिटनेस ट्रॅकिंग डिव्हाइसेस देखील यासाठी मदत करू शकतात. अभ्यास कसा झाला? संशोधन पथकाने 15 वर्षांच्या अभ्यासाच्या आधारे गोळा केलेले पुरावे एकत्रित करून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवर दररोज चालण्याचा परिणाम तपासला. यासाठी सुमारे 50 हजार सहभागींना त्यांचे वय आणि चालण्याचे अंतर यानुसार चार गटात विभागण्यात आले. यामध्ये, सरासरी 3500 पावले चालणारा गट सर्वात कमी होता. दुसरा गट 5800 पावले, तिसरा 7800 पावले आणि चौथा 10900 पावले सरासरी दैनिक गट होता. हे वाचा - आजार कित्येक उपाय फक्त एक; कडुलिंबाच्या पानांचा ज्युस यामुळे ठरतो गुणकारी अभ्यासात काय आढळलं अभ्यासात असं आढळून आलं की, कमीत कमी चालणाऱ्या लोकांपेक्षा तीन स्टेप्स जास्त चालणाऱ्या गटांमध्ये मृत्यूचा धोका 40 ते 53 टक्के कमी असतो. महत्त्वाची बाब म्हणजे कमी पावले चालणाऱ्या गटातील लोकांना किरकोळ वाढ करून चांगला परिणाम मिळवता शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या