नवी दिल्ली, 17 मार्च : होळी-रंगपंचमी (Holi Festival) खेळण्यासाठी प्रत्येकजण आतुर आहे. घराघरात या सणाची तयारी जोरात सुरू झाली आहे. रंगपंचमी, होळीचा सण लहान मुलांकडूनही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंग आणि गुलालाची (Organic Gulal) होळी खेळण्याची मजा काही औरच असते. प्रियजनांसोबत खेळल्या जाणाऱ्या होळीचे रंग वर्षभर मनातील दु:ख दूर करण्यास मदत करतात. होळीसाठी अनेक प्रकारचे रंग आणि गुलाल बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्यापैकी बहुतेकांमध्ये केमिकल्स असतात, ते आपल्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी धोकादायक (Holi Celebration 2022) असतात. होळीच्या मौजमजेमध्ये आपणही आपल्या आरोग्याच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. हर्बल गुलाल कसा बनवायचा याविषयी जाणून घेऊया. घरच्या घरी सेंद्रिय गुलाल सहज तयार करता येतो जो आरोग्यासाठी हानिकारक नसतो. या गुलालाच्या साह्याने तुम्ही होळीचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल आणि तुमची स्वतःचीही सुरक्षितता राखाल. होळीला ऑरगॅनिक गुलाल कसा बनवायचा 1. लाल गुलाल - होळीच्या दिवशी लाल गुलाल मोठ्या प्रमाणात वापरला जातो. घरी लाल गुलाल बनवायचा असेल तर त्यासाठी 3 चमचे कुमकुम, 1 चमचा चंदन पावडर आणि 5 चमचे मैदा घ्या. या तिन्हींचे मिश्रण करून लाल गुलाल तयार करता येतो. बाजारातून विकत घेतलेली कुमकुम शुद्ध असावी हे लक्षात ठेवा. 2. गुलाबी गुलाल – गुलाबी गुलाल हा होळीच्या दिवशी सर्वात जास्त वापरला जातो. हा गुलाल बनवण्यासाठी बाजारातून बीटरूट आणा आणि तुकडे करून नंतर उन्हात वाळवून घ्या. बीटरूट कोरडे झाल्यावर त्यात 3 चमचे तांदळाचे पीठ घाला. आता दोन्ही मिक्स करून चांगले चोळा. तुमच्यासाठी गुलाबी हर्बल गुलाल तयार होईल. 3. केशरिया गुलाल – केशराचा गुलाल बनवण्यासाठी 3 चमचे केशर सिंदूर घ्या. एक चमचा चंदन पावडर आणि 5 चमचे बेसन घ्या. हे सर्व चांगले मिसळा, झाला तयार केशरिया गुलाल. यासाठी तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बाजारातून केशर सिंदूर खरेदी करू शकता किंवा हनुमानजींना अर्पण केलेला ओला सिंदूर खरेदी करू शकता. हे वाचा - घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? काय आहे त्या पाठीमागचं कारण 4. हिरवा गुलाल – हिरव्या रंगाचा गुलाल वापरण्यासाठी बाजारातून फूड ग्रेड हिरवा रंग आणावा आणि त्यात टॅल्कम पावडर मिसळावी. त्याचे प्रमाण 10 चमचे टेल्कम पावडर आणि एक चमचा फूड ग्रेड हिरवा रंग ठेवा. हर्बल हिरवा गुलाल तयार होईल. हे वाचा - चालण्याचा व्यायाम करताना अनेकांकडून ही चूक होते; फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक 5. पिवळा गुलाल - पिवळ्या रंगाचा गुलाल देखील होळीवर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तुम्ही तो घरी सहज पिवळा गुलाल बनवू शकता. यासाठी 3 चमचे हळद, 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 1 चमचा चंदन पावडर घेऊन तिन्ही मिक्स करा. तुमचा ऑरगॅनिक पिवळा गुलाल तयार होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.