जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vastu Tips: घरात-दुकानात, वाहनांना 'लिंबू-मिरची'च का बांधतात? काय आहे त्या पाठीमागचं कारण

Vastu Tips: घरात-दुकानात, वाहनांना 'लिंबू-मिरची'च का बांधतात? काय आहे त्या पाठीमागचं कारण

Vastu Tips: घरात-दुकानात, वाहनांना 'लिंबू-मिरची'च का बांधतात? काय आहे त्या पाठीमागचं कारण

काही लोक वास्तूदोष दूर करण्यासाठी लिंबू आणि मिरचीचा वापर करतात. लिंबू-मिरची लटकवण्यामागचे नेमके कारण काय असतं याविषयी जाणून (Vastu For Nimbu-Mirch) घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 मार्च : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की कित्येक लोक त्यांच्या दुकानाच्या, वाहनांच्या आणि घराच्या गेटबाहेर लिंबू आणि मिरची बांधुन टांगतात. काही लोक याला अंधश्रद्धा मानतात, परंतु अनेकांचा यावर पूर्ण विश्वास आहे आणि घर, दुकान आणि कारमध्ये लिंबू-मिरची लटकवल्याने अनेक समस्या मागे लागत नाहीत. काही लोक आपल्या भरभराटीसाठी आणि विविध प्रकारच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी असं करतात. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की, लिंबू-मिरची टांगल्याने नकारात्मकता (Negativity) दूर होते आणि सर्वत्र सकारात्मकतेचा संचार होतो. त्याचबरोबर काही लोक वास्तूदोष दूर करण्यासाठी लिंबू आणि मिरचीचा वापर करतात. लिंबू-मिरची लटकवण्यामागचे नेमके कारण काय असतं याविषयी जाणून (Vastu For Nimbu-Mirch) घेऊया. नजर लागू नये म्हणून असे मानले जाते की लिंबू-मिरची लटकवल्यानं आपल्या मालमत्तेला कोणाची वाईट नजर लागत नाही. वास्तुशास्त्रानुसार, लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा लागणारी नजर उतरवण्यास उपयुक्त आहे. लिंबू लटकवण्यामागील सायन्स दारावर लिंबू-मिरची लटकवण्यामागेही शास्त्र आहे, असे काही लोक मानतात. वास्तविक, जेव्हा आपण मिरची, लिंबू यांसारख्या गोष्टी डोळ्यांसमोर पाहतो, तेव्हा आपल्याला त्याची चव मनाला जाणवू लागते. यामुळे आपण ते जास्त वेळ पाहू शकत नाही आणि लगेच आपले लक्ष तिथून काढून घेतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या कामात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. विज्ञानानुसार कोणतीही चांगली वस्तू पाहिल्यानंतर मेंदूच्या पेशी चांगल्या प्रकारे काम करू लागतात आणि मनात सकारात्मकतेचा संचार होतो. आरोग्य लिंबू आणि मिरची आरोग्यासाठी खूप चांगली आहे. दोन्हीमध्ये व्हिटॅमिन-सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. व्हायरल इन्फेक्शनपासून आपण वाचतो. याशिवाय लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते. जेव्हा ते दारावर टांगले जाते तेव्हा त्यांच्या उग्र वासामुळे डास, माश्या आणि बरेच कीटक घरात आणि दुकानात प्रवेश करू शकत नाहीत. हे पर्यावरण शुद्ध करते आणि लोकांच्या आरोग्याचे रक्षण होते. हे वाचा -  महागड्या नाईट क्रीमपेक्षा चेहऱ्याला लावा गाईचं तूप; मिळतील इतके सगळे फायदे त्याचे वास्तुशास्त्रातील योगदान लिंबू-मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात, त्या लटकवल्याने आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते. वास्तुशास्त्रानुसार जेथे लिंबाचे झाड असते, त्याच्या सभोवतालची जागा पूर्णपणे शुद्ध असते. अशा वेळी ज्या घरात लिंबाचे झाड असते, ते घर पूर्ण शुद्ध मानले जाते. प्रत्येक घरात लिंबाचे झाड लावणे शक्य नसते म्हणून लोक घराच्या दारावर लिंबू-मिरची टांगतात. लिंबूमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे वास्तू दोषही कमी होतात. हे वाचा -  Weight Loss Drinks: बेली फॅटला फास्ट कमी करतात ही ड्रिंक्स; तुम्हीही वापरून पाहा (सूचना : येथे दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: lifestyle
  • First Published :
जाहिरात
जाहिरात