मुंबई, 07 नोव्हेंबर : वयाची चाळिशी आली, की थोडं एकाकीपण जाणवू लागतं. विशेषतः स्त्रियांना या वयात एकटेपणा जाणवतो. मुलं कॉलेज किंवा नोकरी करू लागलेली असतात. त्यामुळे त्यांच्यामागे धावण्याची फारशी आवश्यकता नसते. आता हाताशी थोडा जास्त वेळ असतो. याच वयात खरं तर स्त्रिया अनेक छंद जोपासू शकतात. यामुळे मन ताजतवानं होतं आणि काही नवीन केल्याचं समाधानही मिळतं. आपल्या अंगातील कौशल्यांना वाव देण्याची हीच वेळ असते. वेळ आहे, पण काय करायचं हे समजत नसेल, तर त्यांच्यासाठी हे काही पर्याय आहेत. चित्रकलेचा छंद चित्र काढण्याची आवड असेल, कलेचं अंग असेल, तर स्केचेस काढणं, डूडलिंग करणं हे नक्कीच करता येऊ शकतं. यामुळे तुमच्यातल्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल. तुमच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचं हे उत्तम साधन असतं. मनात साचलेल्या अनेक गोष्टींमुळे मनावर ताण येत असेल, तर चित्र काढणं यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. यामुळे मनावरचा ताण हलका होईल. हेही वाचा - Period Cramps : मासिक पाळीच्या वेदना त्वरित होतील कमी; या 4 पद्धतीने करा आल्याचं सेवन लिखाण वाचायला आवडतं, पण कधी लिहून पाहिलं नसेल, तर चाळिशीतल्या वेळेचा सदुपयोग नक्की करा. लिखाणाद्वारे मनातल्या भावना व्यक्त व्हायला मदत होते. काहीवेळा आपलं लिखाण वाचून आनंद मिळतो. रोजनिशी लिहिणं केवळ चाळिशीतच नाही, तर रोजनिशी लिहिण्याची सवय एरवीही चांगलीच असते, मात्र चाळिशीत हातात वेळ भरपूर असतो. त्यामुळे डायरीत विविध अनुभव लिहिता येऊ शकतात. तुम्ही आहात तसे इथे व्यक्त होता येतं. त्यामुळे आत्मचिंतन करायला मदत होऊ शकते. फोटोग्राफी फोटो काढण्याचा अनेकींना छंद असतो. तो जोपासण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. विविध गोष्टी यामुळे टिपता येतात. अनेक आठवणींचा खजिना जपता येतो. फोटोग्राफीचा छंद चाळिशीमध्ये आनंद देणारा ठरू शकतो. धावणं चाळिशीमध्ये मिळालेल्या वेळेचा सर्वांत मोठा उपयोग आरोग्य जपण्यासाठी करता येऊ शकतो. धावणं हा ताण हलका करणारा महत्त्वाचा व्यायाम आहे. एरोबिक प्रकारातला हा व्यायाम केल्यामुळे मनावरचा ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते. नको त्या गोष्टींचा विचार करण्यात अडकलेल्या मनाला पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी धावण्याचा व्यायाम फार उपयोगी ठरतो. पर्यायानं एकाग्रता वाढते.
चाळिशीमध्ये मिळणारा वेळ हा राहून गेलेल्या अनेक गोष्टी करण्यासाठी वापरता येऊ शकतो. कामाच्या व्यापात जर काही छंद जोपासायचे राहिले असतील, तर हा वेळ त्यासाठी नक्कीच सत्कारणी लावा. यामुळे शरीर आणि मन ताजतवानं होईल.