जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Period Cramps : मासिक पाळीच्या वेदना त्वरित होतील कमी; या 4 पद्धतीने करा आल्याचं सेवन

Period Cramps : मासिक पाळीच्या वेदना त्वरित होतील कमी; या 4 पद्धतीने करा आल्याचं सेवन

Period Cramps : मासिक पाळीच्या वेदना त्वरित होतील कमी; या 4 पद्धतीने करा आल्याचं सेवन

काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदनांमुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. तर काहींना बेडवरच राहावे लागते. मात्र काही घरगुती पदार्थांच्या मदतीने तुम्ही या वेदनांपासून सुटका मिळवू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 नोव्हेंबर : मासिक पाळीमध्ये वेदना होणे ही सामान्य बाब आहे. मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना थोडया फार फरकाने वेदना होतातच. मात्र या वेदना खूप होणे किंवा सारख्या वेदना होणे चिंताजनक असू शकते. काही स्त्रियांना यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. तर काहींना बेडवरच राहावे लागते. मात्र काही घरगुती पदार्थांच्या मदतीने तुम्ही या वेदनांपासून सुटका मिळवू शकता. असाच पदार्थ आहे ते म्हणजे आलं. आल्याचे बरेच आरोग्य फायदे आहेत. आलं आपल्याला मासिक पाळीमध्ये खूप आराम देऊ शकते. आले प्रोस्टाग्लॅन्डिन्सची पातळी कमी करण्यास मदत करते, हे एक वेदनादायक संप्रेरक आहे. तसेच हे थकव्याशी लढण्यास मदत करते आणि मासिक पाळी अनियमित असल्यास तीदेखील नियमित करू शकते. चला तर मग पाहूया हे आलं कोणकोणत्या पद्धतीने घ्यावं.

Effect Of Periods On Girls Height : मासिक पाळीनंतर खरंच मुलींची उंची वाढत नाही का?

आल्याला म्हणतात सुपरफूड चांगल्या आरोग्यासाठी आल्यामध्ये सर्व आवश्यक पौष्टिक घटक असतात. त्यात पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे आणि मॅग्नेशियम आढळतात. तसेच त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. बर्‍याच रोगांमध्ये ते औषधासारखे कार्य करते. आल्याच्या पाण्याद्वारे वजनदेखील कमी केले जाऊ शकते. म्हणून त्याला सुपरफूड म्हणतात.

News18लोकमत
News18लोकमत

100 ग्रॅम आल्यामध्ये कॅलरी - 80, फॅट्स - 0.8 ग्रॅम, सोडियम - 13 मिलीग्राम, पोटॅशियम - 415 मिलीग्राम, कार्बोहायड्रेट - 18 ग्रॅम, आहारातील फायबर - 2 ग्रॅम, साखर - 1.7 ग्रॅम, प्रोटीन - 1.8 ग्रॅम. मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी असे घ्या आले आल्याचा चहा : हरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, आपण नियमित दुधाचा चहा पितोच. जेव्हा आपण चहा बनवण्यासाठी पाणी आणि चहा पट्टी उकळते. तेव्हाच त्यात आलंदेखील उकळा. नंतर यामध्ये दूध घाला. अशाप्रकारे तुमचा आल्याचा चहा तयार होतो. आलं तुळशी हर्बल चहा : आल्याचे पातळ काप करा. मग एका पॅनमध्ये पाणी घ्या आणि ते घाला. त्यात तुळशीची पाने घाला. थोडावेळ उकळवा. अशाप्रकारे आलं आणि तुळशीचा हा हर्बल चहा तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनेतून आराम देईल. Ovulation Date : कशी ओळखाल तुमची ओव्ह्युलेशनची तारीख? ही आहे अचूक पद्धत आल्याचा काढा : आल्याचा काढा बनवण्यासाठी पातेल्यात 1 कप पाणी घाला. त्यात थोडे आले आणि ओवा घालून काही वेळ उकळवा. नंतर ते गाळून घ्या आणि थोडेसे कोमट असतानाच वापरा. आल्याचे पाणी : कोमट पाण्यात आलं आणि मध घालून पिणे फायदेशीर ठरू शकते. एक कप पाण्यात थोडेसे आले किसून टाका आणि नंतर ते 10 मिनिटे उकळा. नंतर गॅस बंद करा आणि त्यात मध घाला. हे आल्याचे पाणी प्यायल्याने तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनेपासून अराम मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात