जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तंत्रज्ञानाची कमाल आणि HIV च्या आजारातून झाली सुटका, अशाप्रकारे बरी झालेली पहिलीच महिला

तंत्रज्ञानाची कमाल आणि HIV च्या आजारातून झाली सुटका, अशाप्रकारे बरी झालेली पहिलीच महिला

तंत्रज्ञानाची कमाल आणि HIV च्या आजारातून झाली सुटका, अशाप्रकारे बरी झालेली पहिलीच महिला

जीवघेणा समजल्या जाणाऱ्या एचआयव्ही एड्स (HIV AIDS) या आजारावर आगामी काळात आणखी ठोस उपचार उपलब्ध होतील, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक नवे उपचारतंत्र शोधून काढले असून, एका महिलेवर याआधारे उपचारही केले आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    वॉशिंग्टन, 17 फेब्रुवारी: एचआयव्ही (HIV) हा अत्यंत संसर्गजन्य आणि जीवघेणा आजार (Disease) मानला जातो. या आजारावर अद्यापही संशोधन सुरूच आहे. मात्र, एचआयव्हीवर ठोस अशी उपचारपद्धती उपलब्ध झालेली नाही. ह्युमन इम्युनो डिफिशियेन्सी विषाणूच्या संसर्गामुळे हा आजार होतो. असुरक्षित लैंगिक संबंध हे आजारामागील प्रमुख कारण मानले जाते. आतापर्यंत या आजारावर उपचार उपलब्ध नव्हते, मात्र, अमेरिकेतील शास्त्रज्ञांना या आजारावरील उपचारतंत्र (Therapeutics) शोधून काढण्यात यश मिळालं आहे. या नव्या उपचारतंत्राच्या मदतीने एका महिलेवर केलेले उपचार यशस्वी ठरले असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. जीवघेणा समजल्या जाणाऱ्या एचआयव्ही एड्स (HIV AIDS) या आजारावर आगामी काळात आणखी ठोस उपचार उपलब्ध होतील, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक नवे उपचारतंत्र शोधून काढले असून, एका महिलेवर याआधारे उपचारही केले आहेत. अमेरिकेतील एक एचआयव्हीग्रस्त महिला आता नव्या उपचार तंत्रामुळे पूर्णतः बरी झाली असून, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘एचआयव्ही’सारख्या आजारातून पूर्ण बरी होणारी ती जगातील पहिला ठरली आहे. आतापर्यंत जगभरातील केवळ तीन लोक ‘एचआयव्ही’तून बरे झाले आहेत. हे वाचा- Kidney: या 5 गोष्टी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहेत फायदेशीर; आहारात असायलाच हव्या महिलेला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची माहिती 2013 मध्ये मिळाली होती. चार वर्षांनंतर तिला ल्युकेमियाचे (Leukemia) निदान झाले. या ब्लड कॅन्सर वर (Blood Cancer) हॅप्लो-कार्ड प्रत्यारोपणाद्वारे उपचार केले गेले, यात कॉर्ड ब्लड अर्धवट रक्तगट जुळलेल्या रक्तदात्याकडून घेण्यात आले. यादरम्यान महिलेच्या जवळच्या नातेवाईकांनी तिची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी तिला रक्तदान केले. या महिलेचे 2017 मध्ये शेवटचे प्रत्यारोपण करण्यात आले होते आणि गेल्या चार वर्षांत ती ल्युकेमियातून पूर्णपणे बरी झाली आहे. प्रत्यारोपणानंतर तीन वर्षांनी डॉक्टरांनी तिच्यावर केले जाणारे एचआयव्हीचे उपचारही बंद केले आणि आजपर्यंत तिला पुन्हा कोणत्याही विषाणूची लागण झालेली नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, संशोधकांनी सांगितलं की, ‘स्टेम सेल ट्रान्सप्लांटच्या (Stem Cell Transplant) माध्यमातून या महिलेवर उपचार केले गेले. एचआयव्ही विषाणूविरुद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीने हे स्टेम सेल्स दान केले होते. स्टेम सेल प्रत्यारोपणामध्ये नाभी रज्जूतील रक्ताचा वापर केला. या तंत्रात बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारखं अम्बायकल कॉर्ड (Umbilical cord) स्टेम सेल डोनरच्या रक्ताशी फारसं जुळवावं लागत नाही. हे वाचा- मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नयेत हे 6 पांढरे पदार्थ; शुगर राहील नियंत्रणात यापूर्वी केवळ दोन लोक एचआयव्हीतून बरे झाल्याचं स्पष्ट झालं होतं. ‘द बर्निल पेशंट’ म्हणून ओळखले जाणारे टिमोथी रे ब्राउन 12 वर्षे विषाणूपासून मुक्त राहिले आणि 2020 मध्ये त्यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. 2019 मध्ये एचआयव्हीची लागण झालेल्या अ‍ॅडम कॅस्टिलेजोवरही यशस्वी उपचार करण्यात आले होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात