नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : मधुमेहाच्या रुग्णांनी (Diabetes Patients) आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांना अनेक गोष्टी खाणं-पिणं निषिद्ध आहे. जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करून मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. असं केल्यानं रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णाने साखरयुक्त पदार्थ आणि कार्बोहायड्रेट खाणं टाळावं. अन्नामध्ये तीन प्रकारचे कार्बोहायड्रेट (Carbohydrate) असतात - स्टार्च, साखर आणि फायबर. मधुमेह असलेल्या लोकांसाठी स्टार्च आणि साखर ही सर्वात मोठी (White Food Items Avoid By Diabetes Patients) समस्या आहे. रिफाइंड कार्ब्स, किंवा रिफाइंड स्टार्च, प्लेट्सपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रक्रियेद्वारे तोडले जातात. यामुळे, शरीर त्यांना लवकर शोषून घेते आणि त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. दररोज वापरल्या जाणार्या काही पांढर्या रंगाच्या पदार्थांमध्ये स्टार्च आणि साखरेसारखे कार्बोहायड्रेट भरपूर असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जाणून घेऊया अशा कोणत्या पांढर्या गोष्टी आहेत, जे मधुमेहींनी अजिबात खाऊ नये. पास्ता पास्ता हा सॉस, क्रीम, चीज आणि भरपूर बटर घालून बनवला जातो. यामुळे तुम्हाला भरपूर कॅलरीज, फॅट आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात. हे सर्व मैद्यापासून बनवले जाते जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. त्यामुळे लठ्ठपणाचा धोकाही वाढतो. मधुमेहींनी पास्ता खाणं टाळावं. बटाटा बटाटा जवळपास सगळ्यांनाच आवडतो आणि बटाट्याची भाजी खायला सर्वांना आवडते. बटाट्यामध्ये कॅलरीज, कर्बोदके, चरबी, प्रथिने आणि फायबर असतात. त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य नाही. बटाटे खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. मैदा मैद्यात स्टार्च जास्त प्रमाणात असते तर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. मैद्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. मैद्याचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळे लोकांना मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. साखर साखरेपासून बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये बहुतेक साखर आणि कर्बोदके असतात. त्यामध्ये कोणतेही पौष्टिक घटक फार कमी प्रमाणात असतात. गोड पदार्थ शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकतात. साखरेमुळे वजन वाढणे, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो. हे वाचा - Dental problems: तुमच्या किडणाऱ्या दातांची वेळीच घ्या काळजी; हे 6 उपाय प्रत्येकानं करायलाच हवेत तांदूळ एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, जे लोक पांढरा भात खातात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला प्री-डायबिटीज असेल तर तुम्ही भात खाऊ नये. पांढऱ्या तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. हे वाचा - पहिल्यांदाच विमान प्रवास करताना अशा चुका होतात; Take off साठी या टिप्स ध्यानात ठेवा पांढरा ब्रेड पांढरा ब्रेड मैद्यापासून बनविला जातो, जो परिष्कृत स्टार्चने भरलेला असतो. या गोष्टी साखरेप्रमाणे काम करतात आणि लवकर पचतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. व्हाईट ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यात फायबरचीही कमतरता असते. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.