मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सावधान! ...तर मधुमेहामुळे तुमचा पायही कापावा लागू शकतो, 'ही' लक्षणं ओळखा लवकर

सावधान! ...तर मधुमेहामुळे तुमचा पायही कापावा लागू शकतो, 'ही' लक्षणं ओळखा लवकर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

डायबेटिसमुळे रक्तपेशींवर (Blood Cells) परिणाम होतो. त्यामुळे पाय आणि पायाच्या बोटांपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचण्यास अडचणी निर्माण होतात.

डायबेटिस (Diabetes) अर्थात मधुमेह हा गंभीर स्वरुपाचा आजार आहे. डायबेटिसमुळे हृदयविकार, नेत्रविकार आणि किडनी विकार होण्याची शक्यता जास्त असते. डायबेटिस हा शरीरात गुंतागुंत निर्माण करणारा आजार (Disease) आहे. बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, ताण-तणाव, अनुवंशिकता आणि व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे डायबेटिस होण्याची शक्यता असते. डायबेटिस हा एक क्रोनिक डिसीज (Chronic Disease) आहे. त्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, पण नियंत्रित ठेवता येऊ शकतो. डायबेटिस टाइप -1 (Diabetes Type-1) आणि डायबेटिस टाइप-2 (Diabetes Type-2) हे डायबेटिसचे प्रमुख प्रकार आहेत. हा आजार झालेल्या रुग्णाच्या रक्तात ग्लुकोजचं (Glucose) प्रमाण वाढतं. स्वादुपिंड (Pancreas) इन्शुलिनची (Insulin) निर्मिती करु शकत नसल्याने हे प्रमाण वाढतं. अशा स्थितीत रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवणं हे रुग्णासाठी बऱ्याचदा मोठं आव्हान असतं. डायबेटिसमुळे विविध अवयवांच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. डायबेटिसमुळे पायांवरही (Foot) परिणाम होतो आणि रुग्णाला डायबेटिक न्युरोपॅथी (Diabetic Neuropathy) आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज सारख्या (Peripheral vascular disease) समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच डायबेटिसची अन्य काही लक्षणंदेखील रुग्णांच्या पायांवर दिसून येतात. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे. स्वादुपिंड पुरेशा प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती करू शकत नसल्याने रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. डायबेटिस टाइप -1 मध्ये स्वादुपिंड इन्शुलिनची निर्मिती अजिबात करू शकत नाही. डायबेटिस टाइप -2 मध्ये स्वादुपिंड इन्शुलिनची अत्यंत कमी प्रमाणात निर्मिती करतं. याशिवाय डायबेटिसचा अजून एक प्रकार आहे. त्याला जेस्टेशनल डायबेटिस म्हणतात. हा डायबेटिस प्रामुख्याने महिलांना गर्भधारणेच्या काळात होऊ शकतो. रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण वाढणं, हे या तिन्ही प्रकारांत दिसून येतं. डायबेटिसमुळे रुग्णाला पायांशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात. डायबेटिक न्युरोपॅथीत अनियंत्रित डायबेटिस तुमच्या मज्जातंतूवर परिणाम करू शकतो आणि यामुळे त्यांचं नुकसानही होऊ शकतं. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजमध्ये रक्त प्रवाहावर परिणाम होतो. यामुळे पायांवर काही लक्षणं दिसतात. या लक्षणांविषयी जाणून घेऊया. (Sleeping Overnight With Fans On : शांत झोप लागेल पण...; रात्रभर पंखा लावून झोपण्याचे होतात हे धक्कादायक परिणाम) डायबेटिसमुळे रक्तपेशींवर (Blood Cells) परिणाम होतो. त्यामुळे पाय आणि पायाच्या बोटांपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचण्यास अडचणी निर्माण होतात. एका स्थितीत पायाला होणारा रक्तप्रवाह पूर्णतः खंडित झाल्याने पेशी मृत होतात आणि गॅंगरिन (Gangrene) होतं. त्यामुळे प्रसंगी एखादा अवयव काढून टाकण्याची वेळही उद्भवू शकते. डायबेटिसमुळे गाठ किंवा कॉर्न्स आणि कॉलसची समस्या निर्माण होऊ शकते. कोणत्याही ठिकाणच्या त्वचेवर खूप दाब पडला की ती त्वचा कडक आणि जाड होऊ लागते आणि कॉर्न्स किंवा कॉलसची समस्या निर्माण होते. डायबेटिस असलेल्या रुग्णांना नखांमध्ये संसर्ग (Nail Infection) होण्याची शक्यता अधिक असते. या विकाराला ऑनिकोमायकोसिस असं म्हणतात. यामुळे प्रामुख्याने अंगठ्याच्या नखावर परिणाम होतो. यामुळे नखांचा रंग बदलू लागतो आणि ती खूप जाड होतात. तसंच काही रुग्णांमध्ये नखं आपोआप तुटण्याचीही समस्या दिसून येते. अनेकदा नखांना जखम झाल्यानं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. डायबेटिस न्यूरोपॅथी म्हणजे एक प्रकारचं नर्व्ह डॅमेज (Nerve Damage) होय. हा विकार डायबेटिसच्या रुग्णांमध्ये दिसून येतो. `मेयो क्लिनिक`नं दिलेल्या माहितीनुसार, डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे पायांमधील नसा खराब होतात. त्यामुळे पाय, तळपाय आणि हातांमध्ये वेदना होणं, बधिरता येणं यांसारखी लक्षणं दिसतात. या शिवाय पचनक्रिया, मूत्रमार्ग, रक्तपेशी आणि हृदयाशी संबंधित समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये ही लक्षणं सामान्य स्वरुपाची असतात तर काही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसून येतात. डायबेटिसमुळे नसा खराब झाल्याने अ‍ॅथलिट फूटसारख्या समस्या निर्माण होतात. अ‍ॅथलिट फूट (Athlete's foot) म्हणजे फंगल इन्फेक्शन होय. यामुळे पायांना खाज येणं, पाय लालसर होणं आणि त्वचेला भेगा पडणं अशा समस्या दिसून येतात. हा आजार एक किंवा दोन्ही पायांना दिसून येतो. सर्वसामान्यपणे त्वचेला भेगा पडणं आणि खोल जखम होणं याला अल्सर म्हणतात. डायबेटिक फूट अल्सर (Foot Ulcer) ही एक उघडी जखम असते. 15 टक्के डायबेटिक रुग्णांना हा त्रास जाणवतो. ही समस्या प्रामुख्याने तळपायाला जाणवते. फूट अल्सरमुळे काहीवेळा त्वचा खराब होते. परंतु, समस्या गंभीर स्वरुपाची असल्यास प्रसंगी तो भाग शस्त्रक्रिया करून कापून टाकण्याची वेळही येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी संबंधित रुग्णांनी डायबेटिस नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. यासाठी पूरक आहार, व्यायाम, ताण-तणावाचं व्यवस्थापन गरजेचं आहे.
First published:

Tags: Diabetes, Tips for diabetes

पुढील बातम्या