जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Shocking! स्ट्रेचिंगमुळे फुटली गायिकेच्या मानेतील धमनी; गळ्यातून आता आवाजही निघेना

Shocking! स्ट्रेचिंगमुळे फुटली गायिकेच्या मानेतील धमनी; गळ्यातून आता आवाजही निघेना

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

मानेच्या काही एक्सरसाईझ केल्यानंतर गायिकेच्या मानेत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तिला चालणं-बोलणं अशक्य झालं.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 11 जानेवारी : व्यायाम शरीरासाठी तसा चांगलाच. पण कोणतीही गोष्ट ही अति करणं म्हणजे वाईट. त्याला अगदी व्यायामही अपवाद नाही. अशीच अति एक्सरसाईझ करणं एका गायिकेला चांगलंच महागात पडलं आहे. स्ट्रेचिंग केल्याने या गायिकेच्या मानेतील धमनी फुटली (After stretching singer neck artery dissection) आणि तिचा आवाजच गेला (Singer not talk after stretching neck). यूकेतील 32 वर्षांची हेलेन फैरेल (Helen Farrell) एक प्रोफेशनल गायिका आहे. तिने मानेच्या काही एक्सरसाईझ केल्या. त्यानंतर तिच्या मानेत तीव्र वेदना होऊ लागल्या. पेनकिलर घेऊनही तिला वेदनांपासून आराम मिळाला नाही. तिचा आवाज गेला, तिला साधं उभंही राहता येत नव्हतं. अखेर वैद्यकीय तपासणीत तिच्या मानेतील मुख्य धमनी फुटल्याचं निदान झालं. हेलेनने याबाबत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. तिने सांगितलं, काही वर्षांपूर्वी तिने काइरोप्रॅक्टिक (Chiropractic) पाहिलं होतं. ज्यात मान आखडणं आणि मानेच्या वेदना दूर करणं यासाठी एक्सरसाईझ आणि स्ट्रेचिंग केली जाते. एकदा तिने काइरोप्रॅक्टिकमध्ये दाखवलेल्या व्यायामानुसार आपली मान दोन्ही बाजूला फिरवत होती, त्याचवेळी तिला अचानक तीव्र वेदना झाली. हे वाचा -  बाबो! या अंड्याला सोशल मीडियावर तब्बल 55 दशलक्ष Likes; इतकं का आहे खास पाहा हेलेनला हे मायग्रेन असावं असं वाटलं त्यामुळे तिने ते फार गांभीर्याने घेतलं नाही. तिने पेनकिलर घेतलं. पण त्यानंतरही वेदना कमी झाल्या नाही, त्यामळे तिला थोडी चिंता वाटली. त्यानंतर ती झोपली आणि उठल्यानंतर तिला धक्काच बसला. कारण तिला उभंही राहता येत नव्हतं. तिने मदतीसाठी आवाज देण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडातून आवाजही बाहेर पडत नव्हता. ती बोलूही शकत नव्हती.

जाहिरात

तिचा होणारा नवरा एंडी ईस्टवूड तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. तिथं तिचं काही तपासण्या करण्यात आला. तेव्हा जास्त स्ट्रेचमुळे तिच्या मानेतील मुख्य धमनी फुटल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ज्यामुळे तिच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता.

अथक प्रयत्नानंतर हेलेन आता हळूहळू बोलू लागली आहे. पण ती गाण्याचा प्रयत्न करते, तर तिला गाता येत नाही आहे. डॉक्टरांनी तिला आता तिचे गाण्याचे सर्व कार्यक्रम रद्द करायला लावले आहेत. कारण ती आपल्या गळ्यावर जोर देऊ शकले या स्थितीत नाही. जर तिने असं केलं तर तिची गळ्याची समस्या अधिक वाढेल. फेब्रुवारीपर्यंत असणारे किती तरी म्युझिक शो तिला रद्द करावे लागले आहेत. हे वाचा -  धक्कादायक! सेलिब्रिटींच्या ‘डाय हार्ट’ फॅन्सचा आयक्यू असतो कमी आता आपण कधी गाऊ की नाही याचीच चिंता तिला सतावते आहे. सध्या डॉक्टर तिच्या स्पीच आणि चालण्याच्या थेरेपीवर लक्ष देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात